भाजप खासदार प्रज्ञा सिंह ठाकूर यांच्याविरोधात वॉरंट; मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी सुनावणीत गैरहजर

विशेष प्रतिनिधी

मुंबई : मालेगावमध्ये 2008 साली झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणी मुंबईतील विशेष एनआयए कोर्टात खटल्याची सुनावणी झाली. भोपाळमधील भाजपा खासदार प्रज्ञा सिंह ठाकूर यांच्या विरोधात कोर्टाने 10,000 रुपयांचे जामीन पात्र वॉरंट जारी केले आहे.Warrant against BJP MP Pragya Singh Thakur; Absent in hearing in Malegaon blast case

कोर्टाच्या आदेशानंतरही गैरहजर

खासदार प्रज्ञा सिंह ठाकूर मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी असून कोर्टाच्या आदेशानंतरही त्या सुनावणीसाठी हजर न झाल्याने कोर्टाने पुन्हा जामीनपात्र वॉरट जारी केला आहे. तर विशेष एनआयए न्यायालयाने प्रज्ञा ठाकूर यांच्यासह अन्य आरोपींना न्यायालयाने निर्देशीत केलेल्या तारखांना त्यांचे जबाब नोंदविण्यासाठी हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.



कोर्टाने अर्ज फेटाळला

खासदार प्रज्ञा सिंह ठाकूर मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी आहेत. या प्रकरणाच्या सुनावणीसाठी खासदार प्रज्ञा सिंह ठाकूर यांना कोर्टाने हजर राहण्यास सांगितले होते. यासंदर्भात आदेश देऊनही त्या कोर्टात हजर राहिल्या नाहीत. दरम्यान, खासदार प्रज्ञा सिंह ठाकूर यांच्या वकिलाने प्रकृतीच्या कारणास्तव हजर राहण्यापासून सूट मिळावी म्हणून अर्ज दाखल केला होता, परंतु कोर्टाने तो फेटाळला आणि जामीनपात्र वॉरंट जारी केले, जे 20 मार्च रोजी परत केले जाऊ शकते.

गेल्या महिन्यात म्हणजेच फेब्रुवारीमध्ये न्यायाधीशांनी प्रज्ञा ठाकूर यांना बजावले होते की, जर त्या न्यायालयीन कामकाजात हजर राहिल्या नाही तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असा इशारा देखील कोर्टाने यापूर्वीच दिला होता.

मालेगाव बॉम्बस्फोटात 6 जण ठार

दरम्यान, 2008 मध्ये महाराष्ट्रातील मालेगाव शहरात एका मशिदीजवळ बॉम्बस्फोट झाला होता. या स्फोटात 6 जणांचा मृत्यू झाला होता. तर 100 हून अधिक लोक जखमी झाले. दरम्यान, या बॉम्बस्फोट प्रकरणाचा तपास सुरुवातीला महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथक म्हणजेच एटीएसकडून करण्यात आला. त्यानंतर नंतर 2011 मध्ये हे प्रकरण एनआयएकडे वर्ग करण्यात आले होते. याप्रकरणी 2017 मध्ये मुंबई उच्च न्यायालयाने प्रज्ञा सिंह ठाकूर यांना जामीन मंजूर केला होता.

भाजपने तिकीट कापले

दरम्यान, 2 मार्च रोजी भाजपाने लोकसभा निवडणुकीसाठी 195 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. यामध्ये मध्य प्रदेशातील एकूण 29 लोकसभा जागांपैकी 24 उमेदवारांचाही समावेश आहे. यात भोपाळच्या खासदार प्रज्ञा सिंह ठाकूर यांचे तिकीट भाजपाने कापले आहे. त्यांच्या जागी भोपाळचे माजी महापौर आलोक शर्मा यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

Warrant against BJP MP Pragya Singh Thakur; Absent in hearing in Malegaon blast case

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात