विशेष प्रतिनिधी
मुंबई, नवी दिल्ली : पालघरमधील सेक्युलर लिंचिंग प्रकरणी थेट सोनिया गांधींना लक्ष्य करणाऱ्या रिपब्लिक नेटवर्कच्या अर्णव गोस्वामीच्या कारवर युवक काँग्रेसच्या गुंडांनी रात्री हल्ला केला. मात्र आता हल्लेखोरांना वाचविण्यासाठी पोलिसांनी दाखल केलेल्या एफआयआरमध्ये सर्व सौम्य कलमे लावण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे.
अर्णव गोस्वामी यांनी तक्रारीत युवक काँग्रेसच्या गुंडाचा उल्लेख केला असताना एफआयआरमध्ये युवक काँग्रेसचे नावही दाखल करण्यात आलेले नाही.
पालघर प्रकरणी सोनिया गांधींचे मौन का? असा प्रश्न अर्णव यांनी विचारला होता. त्यावर काँग्रेसकडून कोणतेही उत्तर दिले गेले नाही त्याऐवजी युवक काँग्रेसच्या गुंडांनी अर्णव आणि त्यांच्या पत्नीवर हल्ला केला. देशभरातून या हल्ल्याचा तीव्र निषेध होत आहे. अयोध्यापासून काशीपर्यंत सर्व संत समाजाने आणि केंद्रीय मंत्र्यांनी या हल्ल्याचा निषेध केला आहे.
मोदी सरकारच्या काळात असहिष्णुता वाढली असे म्हणणारेच किती असहिष्णू आहेत, हे दिसून आले, अशी टीका केंद्रीय गृह राज्यमंत्री जी. किशन रेड्डी यांनी केली. अनेकांनी देशातल्या तथाकथित लिबरल्सवर टीकेची झोड उठवली.
Shocking to see Arnab Goswami attacked after Congress CMs publicly threatened him. Sad to see such public hounding of a journalist for his freedom of speech. Congress shows it is the party that brought Emergency and continues it’s rich tradition of trampling free speech.— Jagat Prakash Nadda (@JPNadda) April 23, 2020
Shocking to see Arnab Goswami attacked after Congress CMs publicly threatened him. Sad to see such public hounding of a journalist for his freedom of speech. Congress shows it is the party that brought Emergency and continues it’s rich tradition of trampling free speech.
या सर्व पार्श्वभूमीवर अर्णव गोस्वामी यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. कितीही हल्ले करा. आम्ही प्रश्न विचारत राहणारच, असे अर्णव यांनी स्पष्ट केले आहे. सोनिया गांधींचा परिवार देशात सर्वांत डरपोक परिवार असल्याची टीका अर्णव यांनी केली आहे. महाराष्ट्रात काँग्रेसचा दबाव असल्याने एफआयआरमध्ये युवक काँग्रेसच्या नावाचा समावेश करता आला नाही, असे पोलिस सूत्रांनी सांगितले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App