वृत्तसंस्था
नवी दिल्ली : दिल्लीत एका पोलीस कर्मचाऱ्याने गैरवर्तन केल्याची घटना समोर आली आहे. एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक पोलीस रस्त्यावर नमाज अदा करणाऱ्यांना लाथ मारत असल्याचे दिसत आहे. हे प्रकरण दिल्लीतील इंद्रलोक भागातील असल्याचे सांगण्यात येत आहे.Delhi Police kicks worshipers; Accused sub-inspector suspended, strong protest from public
हा व्हिडिओ समोर आल्यानंतर पोलिसांनी तपासाचे आदेश दिले होते. यानंतर आरोपी उपनिरीक्षकाला निलंबित करण्यात आले आहे.
व्हिडिओनुसार, रस्त्यावर नमाज अदा करणाऱ्या लोकांमध्ये एका व्यक्तीला पोलिस मागून लाथ मारतात. ते काही अपशब्दही बोलतात. यानंतर ते समोरच्या व्यक्तीलाही लाथ मारतात. त्यानंतर पोलीस नमाज अदा करणाऱ्या लोकांना तेथून निघून जाण्यास सांगतात.
History Made in Mizoram as a Woman MLA Occupies Speaker's Seat for First Time https://t.co/Oa4PjvZMia — nikhil wagle (@waglenikhil) March 8, 2024
History Made in Mizoram as a Woman MLA Occupies Speaker's Seat for First Time https://t.co/Oa4PjvZMia
— nikhil wagle (@waglenikhil) March 8, 2024
पोलिस कर्मचाऱ्याच्या गैरवर्तनानंतर अनेक लोक जमा होऊन त्याच्याशी वाद घालतात. अनेक लोक पोलिसाचा व्हिडिओ बनवतात. व्हिडिओमध्ये एका व्यक्तीचा आवाज ऐकू येत आहे – हा पोलिस नमाज अदा करणाऱ्या लोकांना लाथ मारत आहे.
कडक कारवाई करणार- दिल्ली पोलिस उपायुक्त
पोलिस कर्मचाऱ्याने नमाज पढणाऱ्या लोकांना लाथ मारल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर तपासाचे आदेश देण्यात आले आहेत. दिल्लीचे पोलिस उपायुक्त एमके मीणा म्हणाले- प्रकरणाची चौकशी सुरू झाली आहे. योग्य ती कारवाई केली जाईल.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App