विरोधकांचा 2024 साठी चाललाय झगडा; मोदींचा तयार झालाय “विकसित भारत 2047” चा आराखडा!!

Modi's cabinet meeting discusses plans for next 5 years including Developed India, Vision 2047

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : एकीकडे विरोधक 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी वेगवेगळ्या पातळ्यांवर झगडत असताना दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या मंत्रिमंडळाच्या आजच्या अधिकृत अखेरच्या बैठकीत विकसित भारत 2047 च्या आराखड्यावर व्यापक चर्चा केली. Council of Ministers brainstorm on vision document ‘Viksit Bharat 2047’, detailed action plan for next 5 years

पंतप्रधानांच्या निवासस्थानी 7 लोक कल्याण मार्ग येथे झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मोदींच्या मंत्रिमंडळातले सर्व मंत्री हजर होते. आजच्या बैठकीत मोदींनी “विकसित भारत 2047” हाच अजेंडा चर्चेसाठी ठेवला होता. त्यातली पहिली उपचर्चा पुढच्या 5 वर्षांच्या सविस्तर कृती आराखड्याची होती. त्यातही आणखी एक उपचर्चा 2024 ची निवडणूक पार पडल्यानंतर नवे मंत्रिमंडळ लवकरात लवकर बनवून पहिल्या 100 दिवसांमध्ये तातडीने अंमलात आणण्याच्या योजना विषयीची होती.

एकीकडे विरोधकांची “इंडिया” आघाडी अजूनही जागा वाटपाच्या झगड्यात अडकले आहेत. दिल्ली, उत्तर प्रदेश आणि एक दोन छोटी राज्ये वगळता दुसरीकडे कुठेही आघाडीतल्या जागावाटपाच्या चर्चेशिवाय ठोस काहीच घडताना दिसत नाही. त्यांचे नेते राहुल गांधी, अखिलेश यादव, ममता बॅनर्जी, एम. के. स्टालिन, शरद पवार, उद्धव ठाकरे आपापले पक्ष वाचवण्यासाठी झगडत आहेत. राहुल गांधी अधून मधून परदेशात जाऊन येत आहेत.



विरोधकांच्या अशा सैरभैर अवस्थेत पंतप्रधान मोदींनी मात्र 2024 ची निवडणूक भाजपने जिंकल्यात जमा आहे, या आत्मविश्वासाने मंत्रिमंडळाच्या अखेरच्या बैठकीत आपल्या नव्या सरकारचा 100 दिवसांचा कृती आराखडा, त्या पुढचा 5 वर्षांचा कृती आराखडा आणि “विकसित भारत 2047” चा आराखडा या विषयावर व्यापक विचार विनिमय केला.

या चर्चेदरम्यान संपूर्ण मंत्रिमंडळासमोर त्रिस्तरीय प्रेसेंटेशन सादर करण्यात आले. या प्रेझेंटेशनची अध्यक्षता स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली. यावेळी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, गृहमंत्री अमित शाह, अर्थमंत्री निर्मला सीतारामन रस्ते पायाभूत सुविधा निर्माण मंत्री नितीन गडकरी, परराष्ट्रमंत्री सुब्रमण्यम जयशंकर, आदिवासी विकास मंत्री अर्जुन मुंडा हे पहिल्या रांगेत होते.

पंतप्रधान मोदींनी आपल्या मंत्रिमंडळातल्या सर्व सदस्यांना “विकसित भारत 2047” च्या आराखड्यामध्ये व्यापक स्वरूपात योगदान देण्याची 2 वर्षांपूर्वीच सूचना केली होती. त्यानुसार वेगवेगळ्या मंत्रालयांच्या मंत्र्यांनी आणि विविध स्तरांवरच्या अधिकाऱ्यांनी वेगवेगळ्या नागरी समाज घटकांशी, संस्थांशी, शास्त्रज्ञांशी, अर्थतज्ज्ञांशी, आर्थिक – सामाजिक – शैक्षणिक संस्थांशी, उद्योग क्षेत्रातील घटकांशी चर्चा केल्या.

संपूर्ण देशात आणि अन्य देशांमध्ये “विकसित भारत 2047” या संकल्पनेवर तब्बल 2700 बैठका घेतल्या. तब्बल 20 लाख युवकांनी या संकल्पनेमध्ये विविध स्तरांवर विविध सूचना केल्या. सर्व सूचनांच्या आधारे प्रत्येक मंत्रालयाने आपापल्या मंत्रालयांच्या त्रिस्तरीय योजना आखल्या आणि त्याचे प्रेझेंटेशन संपूर्ण मंत्रिमंडळासमोर आज सादर केले. यातून पंतप्रधान मोदी आणि संपूर्ण मंत्रिमंडळाचा आत्मविश्वासच प्रकट झाला!!

Council of Ministers brainstorm on vision document ‘Viksit Bharat 2047’, detailed action plan for next 5 years

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात