बंगालमधील रामनवमी हिंसाचार प्रकरणात 16 जणांना अटक; NIAने फुटेजवरून आरोपींची ओळख पटवली

वृत्तसंस्था

कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये गेल्या वर्षी रामनवमीच्या दिवशी झालेल्या हिंसाचारप्रकरणी राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) 16 जणांना अटक केली आहे. या सर्वांना कट रचणे, दंगल भडकावणे आणि धार्मिक मिरवणुकीत जातीय हल्ला केल्याच्या आरोपाखाली पकडण्यात आले आहे.16 arrested in Bengal Ram Navami violence case; NIA identified the accused from the footage

एनआयएला तपासादरम्यान हिंसाचाराचे व्हिडिओ फुटेज मिळाल्याचे वृत्त एएनआय या वृत्तसंस्थेने दिले आहे. यावरून आरोपींची ओळख पटवून त्यांना अटक करण्यात आली.



उत्तर दिनाजपूरमधून हिंसाचार सुरू झाला

पश्चिम बंगालमधील उत्तर दिनाजपूर जिल्ह्यात 30 मार्च 2023 रोजी विश्व हिंदू परिषदेच्या रामनवमी मिरवणुकीत दोन समुदायांमध्ये हिंसाचार झाला होता. 24 तासांनंतर हावडा येथील शिबपूरमध्ये पुन्हा दगडफेक झाली. 3 पोलिसांसह सुमारे 15 जण जखमी झाले. 10 हून अधिक वाहने जाळली. 20 हून अधिक दुकानांची तोडफोड करण्यात आली.

याप्रकरणी राज्य पोलिसांनी 162 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. यानंतर 27 एप्रिल 2023 रोजी कोलकाता उच्च न्यायालयाने NIA ला या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले होते.

16 arrested in Bengal Ram Navami violence case; NIA identified the accused from the footage

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात