पंतप्रधान मोदी पश्चिम बंगालमध्ये 1, 2 आणि 6 मार्च रोजी जाहीर सभांना संबोधित करणार

संदेशखळीमधील पीडित महिलांची भेट घेण्याचीही शक्यता


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या तारखा लवकरच जाहीर होणार आहेत. पंतप्रधान मोदी मार्चच्या पहिल्या आठवड्यात पश्चिम बंगालच्या तीन दिवसांच्या दौऱ्यावर जाणार आहेत. 1-2 मार्चनंतर ते 6 मार्चला पुन्हा बंगालला जाणार आहेत. 1 मार्चला आरामबागमध्ये पंतप्रधानांची जाहीर सभा, 2 मार्चला कृष्णानगरमध्ये सभा आणि 6 मार्चला बारासातला पंतप्रधानांचा दौरा होणार आहे.Prime Minister Modi will address public meetings in West Bengal on March 1-2 and 6



भाजपा पश्चिम बंगाल युनिटचे प्रमुख सुकांत मजुमदार यांनी गुरुवारी सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी 6 मार्च रोजी राज्याच्या उत्तर 24 परगणा जिल्ह्यातील बारासात येथे महिलांच्या सभेला संबोधित करू शकतात. संदेशखळीतील अत्याचारित महिलांनी पंतप्रधानांना भेटण्याची इच्छा व्यक्त केल्यास पक्ष बैठकीचे नियोजन करेल, असे मजुमदार यांनी सांगितले.

मजुमदार यांनी पत्रकारांना सांगितले की, “आम्हाला आज कळले की पंतप्रधान ६ मार्चला राज्याचा दौरा करणार आहेत आणि बारासात येथे महिलांच्या सभेला संबोधित करणार आहेत.”

उत्तर 24 परगणा जिल्ह्यातील संदेशखळी येथील महिलांना पंतप्रधान भेटणार का, असे विचारले असता मजुमदार म्हणाले, ‘संदेशखळीच्या मातांना आणि भगिनींना पंतप्रधान मोदींना भेटायचे असेल, तर आम्ही त्याची व्यवस्था नक्कीच करू.’ संदेशखळीतील मोठ्या संख्येने महिलांनी तृणमूल काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शाहजहान शेख आणि त्यांच्या समर्थकांवर जमीन हडप आणि लैंगिक छळाचे आरोप केले आहेत.

Prime Minister Modi will address public meetings in West Bengal on March 1-2 and 6

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात