रविशंकर प्रसाद यांचे ममता बॅनर्जींवर जोरदार टीकास्त्र, म्हणाले…

संदेशखळी प्रकरणावरून सध्या पश्चिम बंगालमधील वातावरण तापले आहे.


विशेष प्रतिनिधी

कोलकाता : पश्चिम बंगालमधील संदेशखळीमध्ये सुरू असलेला वाद सातत्याने राजकीय रंग घेत आहे. भारतीय जनता पक्षाचे नेते रविशंकर प्रसाद यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर जोरदार टीका केली आहे.Ravi Shankar Prasads strong criticism of Mamata Banerjee



रविशंकर प्रसाद म्हणाले की, संदेशखळीमध्ये सुरू असलेली परिस्थिती पाहता ममता बॅनर्जींनी त्यांचा विवेक गमावला आहे. ममता बॅनर्जी या प्रकरणात काय लपवू इच्छितात आणि त्या असे का करत आहेत, असे रविशंकर प्रसाद यांनी म्हटले आहे.

भाजप नेते आणि बिहारमधील पाटणा साहिबचे खासदार रविशंकर प्रसाद यांनी बुधवारी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांना घेरले. ‘संदेशखळीचे प्रकरण अत्यंत गंभीर असल्याचे ते म्हणाले. आपल्या समाजासाठी ही एक लाजिरवाणी घटना आहे. मात्र मुख्यमंत्री ममता बॅनर्जी अजूनही हे प्रकरण वाचवण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. त्यांना काय लपवायचे आहे ते समजत नाही.’ असं ते म्हणाले.

Ravi Shankar Prasads strong criticism of Mamata Banerjee

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात