…म्हणून सोनिया गांधींनी रायबरेलीच्या जनतेला लिहिले पत्र

लोकसभा निवडणूक का लढवणार नसल्याचे सांगितले, म्हणाल्या…


नवी दिल्ली : काँग्रेस संसदीय पक्षाच्या प्रमुख सोनिया गांधी यांनी रायबरेलीच्या जनतेचे पत्र लिहून कृतज्ञता व्यक्त केली असून प्रकृती आणि वृद्धत्वामुळे आपण पुढील लोकसभा निवडणूक लढवणार नसल्याचे सांगितले. त्यांनी रायबरेलीच्या लोकांप्रती कृतज्ञता व्यक्त केली आणि सांगितले की त्या त्यांचे थेट प्रतिनिधित्व करत नसल्या तरी त्यांचे मन आणि आत्मा नेहमीच तेथील लोकांसोबत असेल.Sonia Gandhi wrote a letter to the people of Rae Bareli



सोनिया गांधी यांनी पत्रात म्हटले आहे की, ‘आता प्रकृती आणि वाढत्या वयामुळे मी पुढील लोकसभा निवडणूक लढवणार नाही. या निर्णयानंतर मला थेट तुमची सेवा करण्याची संधी मिळणार नाही, मात्र माझे मन आणि आत्मा सदैव तुमच्या सोबत राहील, हे निश्चित आहे.”

सोनिया गांधी यांनी बुधवारी राजस्थानमधून राज्यसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्या पहिल्यांदाच वरिष्ठ सभागृहात जात आहे. 1999 पासून त्या लोकसभेच्या सदस्या आहेत. 2004 पासून त्या लोकसभेत रायबरेलीचे प्रतिनिधित्व करत आहेत.

सोनिया गांधींनी पत्रात काय लिहिले?

“नमस्कार… दिल्लीत माझे कुटुंब अपूर्ण आहे. ते रायबरेलीला आल्यावर आणि तुम्हा सर्वांना भेटल्यानंतर पूर्ण होते. हे जवळचे नाते खूप जुने आहे आणि मला ते माझ्या सासरच्या मंडळींकडून मिळाले आहे. रायबरेलीशी आमच्या कौटुंबिक संबंधांची मुळे खूप खोलवर आहेत. स्वातंत्र्यानंतर झालेल्या पहिल्या लोकसभा निवडणुकीत तुम्ही माझे सासरे फिरोज गांधी यांना येथून विजयी करून दिल्लीला पाठवले. त्यांच्यानंतर तुम्ही माझ्या सासूबाई खासदार इंदिरा गांधी यांना आपलेसे केले. तेव्हापासून आजतागायत ही मालिका आयुष्यातील चढ-उतार आणि खडतर वाटेवरून प्रेमाने आणि उत्साहाने सुरू राहिली आहे आणि आमचा विश्वास अधिक दृढ झाला आहे.

Sonia Gandhi wrote a letter to the people of Rae Bareli

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात