हरियाणाच्या शंभू बॉर्डर नंतर आता खनौरी सीमेवर गोंधळ, अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या

ड्रोनच्या माध्यमातूनही आंदोलकांवर अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या जात आहेत.


विशेष प्रतिनिधी

चंदीगड : पंजाब आणि हरियाणा सीमेवर (शंभू बॉर्डर) परिस्थिती बिकट झाली आहे. शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळे हरियाणातील अंबाला येथील शंभू सीमेवर युद्धसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. हरियाणा पोलिसांनी शेतकऱ्यांवर अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या आहेत.After Haryanas Shambhu border now riots, tear gas canisters burst at Khanauri border

मंगळवारी दुपारी १२ वाजल्यापासून शंभू सीमेवर पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. आतापर्यंत 100 हून अधिक अश्रुधुराचे गोळे झाडण्यात आले आहेत. शेतकरी बॅरिकेड्स किंवा सुरक्षा कर्मचाऱ्यांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करताच, पलीकडून गोळीबार केला जात आहे. खनौरी हद्दीत एका शेतकऱ्याच्या गुडघ्यावर अश्रुधुराच्या गोळ्या लागल्याने तो जखमी झाला आहे.



मिळालेल्या माहितीनुसार, शेतकरी शंभू सीमेवर लावलेले मोठे दगड मोठमोठ्या ट्रॅक्टरच्या साहाय्याने हटवत आहेत आणि ट्रॅक्टरच्या सहाय्याने पंजाब सीमेकडे खेचत आहेत. या काळात काही बॅरिकेड्सही तोडण्यात आले. ड्रोनच्या माध्यमातूनही आंदोलकांवर अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या जात आहेत. त्याचवेळी खनौरी हद्दीत संगरूरहून निघालेल्या शेतकऱ्यांवर अश्रुधुराचे नळकांडेही डागण्यात आले. शेतकऱ्यांनी पहिला सुरक्षा स्तर तोडला आहे. येथील पुलावर मोठ्या प्रमाणात शेतकरी जमा झाले आहेत.

महत्त्वाची बाब म्हणजे आता मोठ्या प्रमाणात शेतकरी ट्रॅक्टर घेऊन येथे पोहोचले आहेत. येथे संघर्षाची परिस्थिती निर्माण झाली आहे. शेतकरी सतत शंभू सीमा ओलांडण्याचा प्रयत्न करत आहेत. आंदोलकांनी पुलाखालून हरियाणाच्या दिशेने जाण्याचा प्रयत्न केला आहे. शेतकरीही शेतातून पायी पुढे सरसावले आहेत, मात्र त्यांच्यावर अश्रुधुराच्या नळकांड्या फोडण्यात आल्या आहेत.

After Haryanas Shambhu border now riots, tear gas canisters burst at Khanauri border

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात