पुण्याला फ्युचर सिटी बनविण्यासाठी महायुती सरकार कटिबद्ध – देवेंद्र फडणवीस

पुणे मेट्रोला कनेक्टिंग स्कायबस प्रकल्पाचे लवकरच भूमिपूजन होणार आहे.

विशेष प्रतिनिधी

पुणे : पुण्याच्या कन्टोन्मेंट भागातील विविध विकास कामांचे आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भूमिपूजन केले. यावेळी मंत्री चंद्रकांत पाटील, आमदार सुनील कांबळे, आमदार माधुरीताई मिसाळ, आमदार भिमराव आण्णा तापकीर, आमदार सिद्धार्थ शिरोळे, भाजपा महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ, माजी राज्यमंत्री दिलीप कांबळे व इतर मान्यवर उपस्थित होते. Mahayuti government is committed to make Pune a future city Devendra Fadnavis

पुणे कॅन्टोन्मेंट मतदारसंघात सर्वंकष विकासाचा विचार करून विकासकामे सुरु आहेत. एकीकडे भारतरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे सौंदर्यीकरण आणि दुसरीकडे ससून रुग्णालयाच्या चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांसाठी अद्ययावत निवासी इमारत बांधणे हा विलक्षण योगायोग आहे. येथे प्रवाशांच्या सर्व सोयी लक्षात घेऊन पूलगेट बसस्टॉप बांधण्यात येणार आहे. संगम घाटावर देखील विकासकामे होत आहेत. तर उद्यानाचे सौंदर्यीकरण करण्यात येणार आहे

कॅन्टोन्मेंट मतदारसंघातील विकासाला निधी देण्यासाठी पाठपुरावा करण्यात येईल. महानगरपालिका क्षेत्रातील सर्व योजना कॅन्टोन्मेंट मध्ये लागू करण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील आहे. पुणे पीएमपीएमएलचे इलेक्ट्रीक बस मॉडेल देशातील इतर राज्यांसाठी मार्गदर्शक बनले आहे. पुणे मेट्रोला कनेक्टिंग स्कायबस प्रकल्पाचे लवकरच भूमिपूजन होणार आहे. पुण्याच्या रिंगरोडमुळे विकासाच्या नवीन संधी निर्माण होणार आहेत. पुणे शहराचे चित्र बदलण्याचे काम महायुती सरकार करत असून पुण्याला फ्युचर सिटी बनविण्यासाठी महायुती सरकार कटिबद्ध आहे. असंही यावेळी फडणवीस यांनी सांगितलं.

Mahayuti government is committed to make Pune a future city Devendra Fadnavis

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात