Budget 2024 : सरकार पुन्हा येण्याची आणि विकसित भारताच्या पायाभरणीची गॅरंटी; पंतप्रधान मोदींचा निर्वाळा!!

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली :  2024 च्या लोकसभा निवडणुका जाहीर होण्यापूर्वी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मांडलेल्या अंतरिम अर्थसंकल्पातून आपलेच सरकार पुन्हा येण्याची आणि विकसित भारताच्या पायाभरणीची गॅरंटी मिळाल्याचा निर्वाळा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दिला. A guarantee for the return of the government and the foundation of a developed India

संसदेत निर्मला सीतारामन यांनी आज अंतरिम अर्थसंकल्प सादर केला. सीतारामन यांनी या अर्थसंकल्पात कर रचनेत कुठलाही बदल केला नाही. अर्थसंकल्पातून करदात्यांना कुठलाही दिलासा मिळाला नाही. सीतारमण यांनी आयात शुल्कासह प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष करा संबंधीचा प्रस्ताव सादर केला.

मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अर्थसंकल्पातल्या सकारात्मक बाबींकडे विशेषत्वाने लक्ष वेधले. आजच्या अंतिम अर्थसंकल्पातून निर्मला सीतारामन यांनी विकसित भारताच्या पायाभरणीची गॅरंटी दिली. यातून 2047 च्या भारताच्या विकासाचा पाया मजूबत होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. जुलै 2024 चा संपूर्ण अर्थसंकल्प आपलेच सरकार मांडेल असा आत्मविश्वास अंतरिम अर्थसंकल्पातून व्यक्त होत असल्याची बाब पंतप्रधानांनी अधोरेखित केली.

सर्वसामावेश बजेट

पंतप्रधान नरेंद मोदी यांनी अंतरिम अर्थसंकल्प सर्वसमावेशक आणि नाविन्यपूर्ण असल्याचे म्हटले आहे. त्यांनी विकासाचा भरवसा दिला. हा विकास सातत्यपूर्ण होईल असे ते म्हणाले. विकासीत भारताचे चार प्रमुख स्तंभ – तरुण, गरीब, महिला आणि शेतकऱ्यांना सक्षम करण्यावर त्यांनी भर दिला. हे बजेट 2047 पर्यंत भारताला विकसीत राष्ट्र करण्याची गँरटी देत असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

2 कोटी घरे तयार करण्याचे लक्ष्य

आम्ही एक मोठं उद्दिष्ठ ठरवतो आणि ते प्राप्त करण्यासाठी त्यापेक्षा आणखी मोठे उद्दिष्ठ समोर ठेवत असल्याचे पंतप्रधान म्हणाले. गावातील आणि शहरातील गरीबांना 4 कोटींहून अधिक घरे देण्याचे उद्दिष्ठ पूर्ण करण्यात आले आणि आता 2 कोटी घरांचे उद्दिष्ठ गाठायचं असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. देशात दोन कोटी लखपती दीदी तयार करण्याचे लक्ष्य होते. ते वाढवून आता तीन कोटी करण्यात आले आहे. केंद्रीय अर्थमंत्री आणि त्यांच्या टीमला त्यांनी शुभेच्छा दिल्या.

भारताचा पाया मजबूत होणार

पीएम मोदी यांनी हे बजेट भारताचा पाया मजबूत करणार असल्याचा विश्वास व्यक्त केला. बजेट हे विकसीत भारताच्या चार स्तंभावर आधारीत आहे. त्यात युवक, गरीब, शेतकरी आणि महिलांच्या विकासावर भर देणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. वित्तीय तोटा कमी करण्यावर हे सरकार भर देणार असल्याचे त्यांनी सांगितले. शेतकऱ्यांसाठी महत्वपूर्ण आणि मोठे निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले. हे भविष्यातील बजेट असल्याचे त्यांनी सांगितले.

A guarantee for the return of the government and the foundation of a developed India

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात