अंतरिम अर्थसंकल्पावर CII खूष, पूर्ण अर्थसंकल्पाकडून आणखी सुधारणात्मक तरतुदींची अपेक्षा!!

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज मांडलेल्या अंतरिम अर्थसंकल्पाबाबत कन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री अर्थात CII कडून सकारात्मक प्रतिक्रिया आली आहे. त्याचबरोबर संपूर्ण अर्थसंकल्पातून आणखी सुधारणात्मक घोषणांची अपेक्षा CII चे अध्यक्ष रामचंद्रन दिनेश यांनी व्यक्त केली आहे. Expect more reform provisions from the budget

काँग्रेस सह बाकीच्या विरोधकांनी नेहमीप्रमाणे मोदी सरकारच्या अंतरिम अर्थसंकल्पाला नाके मुरडली आहेत. अर्थसंकल्पात कुठलीही ठोस घोषणा नाही. गुंतवणूक घसरलेली असताना केवळ “कॉन्फिडन्स”, “पॉझिटिव्ह अप्रोच” अशा शब्दांची पखरण अर्थमंत्र्यांनी केली, अशी टीका काँग्रेसचे नेते खासदार शशी थरूर यांनी केली. काँग्रेसच्या बाकीच्या नेत्यांनी त्यांच्या सुरात सूर मिसळला.

पण भारतीय उद्योग क्षेत्राकडून मात्र अंतरिम अर्थसंकल्प विषयी सकारात्मकच प्रतिक्रिया आली. CII अध्यक्ष आणि TVS सप्लाय चेन सोल्युशन्स लिमिटेडचे अध्यक्ष रामचंद्रन दिनेश म्हणाले, वित्तीय तूट 5.4 % राहील अशी आमची अपेक्षा होती पण ती घटून 5.1% आली, ही निश्चित खूप लक्षणीय बाब आहे. आर्थिक शिस्तीच्या बाबतीत एक पाऊल पुढे पडले आहे. पण त्याच वेळी, वाढीवर लक्ष केंद्रित न करता. CapEx खर्च जवळजवळ 11.1% वाढला आहे, जो खूप चांगला आहे. त्यामुळे, पायाभूत सुविधांच्या वाढीवर सतत लक्ष केंद्रित केले जाईल. त्यासाठी काही महिन्यांची प्रतीक्षा करावी लागेल. प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष कर प्रस्ताव हे अर्थमंत्र्यांनी म्हटल्याप्रमाणे ते केवळ अंतिम अर्थसंकल्पातच घेतले जाईल. पण विकासासाठी संधी उपलब्ध होण्याच्या दृष्टीने हे एक अतिशय सकारात्मक पाऊल आहे.

Expect more reform provisions from the budget

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात