विशेष प्रतिनिधी
पुणे : सोनिया गांधींच्या परकीयत्वाच्या मुद्द्यावर वरिष्ठांनी काँग्रेसची फारकत घेऊन नवा पक्ष काढला पण अवघ्या 6 महिन्यांमध्ये पक्ष काँग्रेस बरोबरच सत्तेत गेला, मग तेव्हा कुठे गेले होते तुमचे परकीयत्वाचे धोरण??, असा जळजळीत सवाल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरदनिष्ठ गटाचे अध्यक्ष शरद पवार यांना आज केला. जुन्नरच्या शेतकरी मेळाव्यात अजित पवारांनी शरद पवारांनी आजवर घेतलेल्या सर्व राजकीय भूमिकांच्या चिंधड्या उडविल्या. Where has your foreigner policy gone in just 6 months?
अजित पवार म्हणाले :
महाराष्ट्रात आजवर शिवसेनेचे, काँग्रेसचे आणि भाजपचे ही मुख्यमंत्री झाले. पण राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री करण्याची संधी मिळाली नाही. पण ती का मिळाली नाही याचा विचार आपण करणार की नाही? आर. आर. आबा, छगन भुजबळ असे अनेक मातब्बर नेते आपल्याकडे होते. त्यांच्यापैकी कोणालाही मुख्यमंत्री करता आले असते. मी काही माझ्याच नावाचा हट्ट धरला नव्हता. आता अलीकडेच शिवसेनेसोबत सत्तेत गेलो होतो. वरिष्ठांनी निर्णय घेतला की चालतो. पण, कनिष्ठांनी घेतला की का नाही चालत??
1991 ला मी खासदार झालो. कालांतराने मला राजीनामा द्यावा लागला. माझ्या जागी शरद पवार साहेब खासदार झाले. केंद्रात मंत्री झाले. मला राज्यात मंत्री करण्यात आले. पुढे 1995 ला मी फक्त आमदार होतो, काँग्रेसचे सरकार त्यावेळी पडले.
1999 साली परकीय व्यक्तीकडे आपल्या पक्षाचे नेतृत्व नसावे अशी भूमिका वरिष्ठांनी घेतली. त्यानंतर अगदी 6 महिन्यांत आम्ही पुन्हा आमदार झालो आणि राष्ट्रवादी काँग्रेस पुन्हा परकीय नेत्या सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखालच्या काँग्रेससोबत सत्तेत गेली. मग 6 महिन्यांत कुठे गेले तुमचे परकीय व्यक्तीचे धोरण?? तुम्ही केले की ते चालते. मग, आम्ही भाजपसोबत सत्तेत गेलो, तर काय बिघडले??
चासकमान, भामा आसखेड आणि डिंभे धरणासाठी खेड, जुन्नर आणि आंबेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्या. त्यांनी पाणी पळवायचे काम सुरू केले होते, अशी टीका त्यांनी रोहित पवार यांचे नाव न घेता केली. हा प्रकार म्हणजे धरणं उशाशी आणि कोरड घशाशी. मग, हे दिलीप वळसे आणि अतुल बेनके कसे काय खपवून घेतील. जनतेने काय यासाठी त्यांना निवडून दिलेय का?? मतदारांचे प्रश्न सोडवायचे सोडून ते त्या मतदारांना कसे काय संकटात टाकतील??
दिलीप वळसे पाटील यांनी आंबेगावचे पाणी वाचविण्यासाठी निर्णय घेतला. मागे एक वर्ष आपण सत्तेत नव्हती, तर अनेक काम रखडली. माझ्यावर 70000 कोटींच्या घोटाळ्याचा आरोप करण्यात आला. 1960 पासून जलसंपदा विभागात 45000 कोटीच खर्च झाला. पढ माझ्यावर काय आरोप झाला की मी 70000 कोटींचा घोटाळा केला. धादांत खोटा आरोप होता हे पुढे सिद्ध झाले. सत्तेशिवाय कोणताही विकास होत नाही.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App