विशेष प्रतिनिधी
मुंबई : प्रतिवर्षी नवी दिल्ली येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त होणाऱ्या चित्ररथ संचलनात सहभागी होणारा महाराष्ट्राचा चित्ररथ यावर्षी शिवराज्याभिषेकाच्या ३५० व्या महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर बनविण्यात आला आहे. सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या संकल्पनेतून “भारतीय लोकशाहीचे प्रेरणास्थान : छत्रपती शिवाजी महाराज” या विषयावरचा हा चित्ररथ साकारण्यात आला आहे. यावेळी देखील सुधीर मुनगंटीवार यांनी कर्तव्य पथावरील संचलनात हा चित्ररथ सामिल करून घेण्याकरता विशेष प्रयत्न केले आहेत. On the occasion of the 350th anniversary of Shiva Rajyabhishek, duty will be on the road
त्याचबरोबर मुंबईतील शिवाजी पार्क येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त हौणाऱ्या संचलनात सांस्कृतिक कार्य विभागातर्फे शिवराज्याभिषेकावर आधारित चित्ररथही मुनगंटीवार यांच्या संकल्पनेतून सादर केला जाणार आहे.
सन 2024 या वर्षाच्या प्रजासत्ताक दिन नवी दिल्ली चित्ररथ संचलनात 28 राज्ये आणि 7 केंद्रशासित प्रदेश यांच्याकडून विकसित भारत आणि भारत लोकशाहीची जननी या दोन संकल्पनांवर विविध राज्यांना आपल्या चित्ररथाच्या संकल्पना सादर करण्यास केंद्र शासनाने कळविले होते. यास अनुसरून विविध विषयांवर केंद्र शासनास संकल्पनांचे सादरीकरण करण्यात आले होते. छत्रपती शिवाजी महाराज यांचे 350 वे शिवराज्याभिषेक वर्षानिमित्त सुधीर मुनगंटीवार यांनी केलेल्या मार्गदर्शनानुसार श्री शिवराज्याभिषेकाचा ३५० वा महोत्सव आणि लोकशाहीची प्रेरणा या विषयांची सांगड घालून “लोकशाहीचे प्रेरणास्थान: छत्रपती शिवाजी महाराज” या संकल्पनेवर आधारित सादरीकरण संरक्षण मंत्रालयास करण्यात आले होते. मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव तथा प्रधान सचिव सांस्कृतिक कार्य विभाग श्री विकास खारगे यांचेही वेळोवेळी मार्गदर्शन चित्ररथाच्या मांडणीसाठी लाभले आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य आजही सर्वांना प्रेरणादायी आहे. महाराजांनी रयतेला सुखी करण्यासाठी स्वराज्याची स्थापना केली. नवी दिल्ली येथे साकारण्यात येणाऱ्या चित्ररथावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बालपणापासून ते स्वराज्य निर्मितीपर्यंतचे प्रसंग या रथावर दर्शविण्यात आलेले आहेत.
या चित्ररथाची बांधणी राष्ट्रीय रंगशाला दिल्ली केंट या परिसरात करण्यात येत आहे. शुभ ॲड नागपूर या संस्थेमार्फत चित्ररथाची बांधणी करण्यात येत आहे, तर भैरी भवानी परफॉर्मिंग आर्ट या कला पथकामधील १६ कलाकार चमूच्या माध्यमातून चित्ररथाच्या सोबतीने सांस्कृतिक कार्यक्रमाचे प्रदर्शन करण्यात येणार आहे.
दोन्ही चित्ररथ तयार करणाऱ्या आणि सोबत सादरीकरण करणाऱ्या चमूंचे सुधीर मुनगंटीवार यांनी अभिनंदन केले आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App