जाणून घ्या कारण एवढा मोठा दंड ठोठवण्याचं कारण?
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : टाटा समूहाचा भाग बनलेल्या एअर इंडियाला मोठा दंड ठोठावण्यात आला आहे. नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (DGCA) एअर इंडियाला काही लांब पल्ल्याच्या मार्गांवर चालवल्या जाणाऱ्या उड्डाणांच्या संदर्भात सुरक्षा मानकांचे उल्लंघन केल्याबद्दल 1.10 कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे.DGCA fine of Rs 1.10 crore on Air India
बुधवारी जारी केलेल्या निवेदनानुसार, विमान वाहतूक नियामक DGCA ने एअरलाइन कर्मचाऱ्याकडून स्वैच्छिक सुरक्षा अहवाल प्राप्त केल्यानंतर तपशीलवार तपासणी केली. काही महत्त्वाच्या लांब पल्ल्याच्या मार्गांवर एअर इंडियाच्या उड्डाणांमध्ये सुरक्षा मानकांचे उल्लंघनाचा आरोप करण्यात आला आहे.
डीजीसीएने सांगितले की, तपासणीत प्रथमदर्शनी विमान कंपनीने पालन न केल्याचे समोर आले आहे. यानंतर एअर इंडियाला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली. सुरक्षा अहवाल एअर इंडियाद्वारे चालवल्या जाणाऱ्या भाडेतत्त्वावरील विमानांशी संबंधित आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App