वृत्तसंस्था
नवी दिल्ली : देशात कोचिंग संस्था आता 16 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना प्रवेश देऊ शकणार नाहीत. कोचिंगमध्ये माध्यमिक (दहावी) परीक्षेनंतरच नाव नोंदणी होऊ शकेल. यासोबतच कोचिंगमध्ये विद्यार्थी एका दिवसात कमाल पाच तासच शिकतील. विद्यार्थ्यांच्या वाढत्या आत्महत्या, आगीच्या घटना, सुविधांचा अभाव, त्यांच्या शिक्षण पद्धतीबाबत प्राप्त तक्रारीनंतर केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने ही मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत.Ministry of Education Guidelines for Coaching Institutions; Children under 16 are not admitted; Tuition maximum 5 hours
मंत्रालय म्हणाले, कोचिंग संस्था पदवीपेक्षा कमी पात्रतेचे शिक्षक ठेवू शकणार नाहीत. ते मुलांच्या नोंदणीसाठी पालकांना दिशाभूल करणारी आश्वासने, रँक किंवा चांगल्या गुणांची हमी देऊ शकणार नाहीत. मंत्रालय म्हणाले, याचा उद्देश कोचिंग संस्थांचे नियमन करण्यासाठी कायदेशीर संरचनेची गरज पूर्ण करणे व त्यांची वाढती संख्या थांबवणे आहे. मार्गदर्शक तत्त्वांनुसार, कोचिंग संस्थांच्या उपक्रमांच्या देखरेखीची जबाबदारी सर्व राज्य सरकारांची असेल.
असे आहेत नियम…
विद्यार्थी-शिक्षकांना एक दिवस साप्ताहिक सुटी द्यावी लागेल. याच्या पुढच्या दिवशी कोणतीच चाचणी होणार नाही. नोंदणीनंतरच कोचिंग सुरू होऊ शकेल. सध्याच्या कोचिंगना तीन महिन्यांत नोंदणी करावी लागेल.
संस्थेच्या शाखा असल्यास सर्व स्वतंत्र यूनिट असतील. विद्यार्थ्यांसाठी आवश्यक जागा व संसाधने नसेल तर नोंदणी नाही. प्रति विद्यार्थी किमान 1 चौरस मीटर जागा असावी.
सर्व नोंदणीकृत विद्यार्थ्यांना नोट्स व पुस्तके अतिरिक्त शुल्काविना द्यावे लागतील. एखाद्या अभ्यासक्रमाचे शुल्क घेतल्यानंतर वाढवता येणार नाही.
कोचिंगमध्ये आवश्यक तेथे सीसीटीव्ही कॅमरे लावले जावेत. शाळेच्या वेळेत कोचिंग चालणार नाही. विद्यार्थी व शिक्षकाचे प्रमाण योग्य ठेवावे लागेल.
अभियांत्रिकी, वैद्यकीयशिवाय अन्य पर्याय सांगावे लागतील. विद्यार्थ्यांच्या चाचणीचा निकाल सार्वजनिक करू नये. कोचिंग केवळ नोंदणीकृत जागेवरच चालवता येईल.
मध्येच कोर्स सोडला तर उर्वरित शुल्क परत करावे लागेल
नैतिक गैरवर्तनाच्या गुन्ह्यातील दोषी शिक्षक किंवा व्यक्तीला कोचिंग नियुक्त करू शकणार नाही. आपल्या वेबसाइटवर शिक्षकांची पात्रता, अभ्यासक्रम/नोट्स, कालावधी, वसतिगृहाची सुविधा व शुल्काचा तपशील असेल.
शुल्क पारदर्शक आणि तार्किक असले पाहिजे. प्रत्येक विद्यार्थ्यास शुल्क घेतल्यानंतर पावती दिली जावी. विद्यार्थ्याने मध्येच कोर्स सोडला तर उर्वरित कालावधीचे शुल्क परत करावे. अटींचे उल्लंघन केल्यास पहिल्यांदा 25 हजार रुपये, दुसऱ्यांदा 1 लाख दंड लागेल. तिसऱ्यांदा उल्लंघन केल्यास नोंदणी रद्द केली जाईल.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App