शेतीमध्ये नवे प्रयोग करून उत्पादकता वाढवून विषमुक्त शेती करण्याकडे लक्ष द्यावे, असेही म्हटले आहे.
विशेष प्रतिनिधी
सातारा : कृष्णा कृषी व औद्योगिक महोत्सव – 2024 चे कराड, सातारा येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्घाटन केले. यावेळी छत्रपती खासदार उदयनराजे भोसले, आमदार शिवेंद्रराजे भोसले, आमदार जयकुमार गोरे, डॉ. अतुल भोसले, नरेंद्र पाटील आणि इतर मान्यवर उपस्थित होते.Farmers will prosper if agriculture and industry go hand in hand Devendra Fadnavis
याप्रसंगी फडणवीस म्हणाले, ‘काळ्या मातीतून सोने पिकवून अन्न वस्त्र निवाऱ्याची व्यवस्था उभारणारे शेतकरीच देशातील पहिले वैज्ञानिक होते. आज शेतकर्याला समृद्ध बनविण्यासाठी शेतीतील विज्ञान पुन्हा एकदा मांडण्याची गरज आहे. शेतीमध्ये नवे प्रयोग करून उत्पादकता वाढवून विषमुक्त शेती करण्याकडे लक्ष द्यावे लागेल. शेतीमधील आधुनिक राज्य म्हणून पंजाब कडे पाहिले जाते, मात्र आता तेथील जमिनीची उत्पादकता संपू लागली आहे. त्यामुळे खताचा व पाण्याचा वापर योग्यरीत्या व्हायला हवा. पाणी नसतानाही केवळ शेतीमधील विज्ञान समजून घेतल्यानेच इस्रायलने प्रगती केली. यासाठी शेतीमधील नवीन तंत्रज्ञान आपल्याला समजून घ्यावे लागेल.’
याचबरोबर ‘भारतातील लोक हळूहळू विषमुक्त शेती व जेवणाकडे वळत आहेत. उसाची उत्पादकता वाढवत असताना त्यात नवीन प्रयोग गरजेचे आहेत. आज शेतीमधील विविध प्रश्नांवर मार्ग काढण्यासाठी अशा प्रकारच्या कृषी प्रदर्शनांची गरज आहे. कृषी आणि उद्योग हातात हात घालून चालतात तेव्हाच शेतकरी समृद्ध होऊ शकतो. समृद्ध शेतकरी घडविण्यासाठीच कृष्णा परिवाराचा उद्योग सुरू आहे. कृष्णा परिवाराच्या तिन्ही पिढ्या उद्योगाला नवीन आयाम देत आहेत.’ असंही यावेळी फडणवीसांनी सांगितलं.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App