राम मंदिराचे मुख्य 5 मंडपाचे बांधकाम पूर्ण, रामलल्लांची प्राणप्रतिष्ठा संपूर्ण शास्त्रोक्त; राम जन्मभूमी ट्रस्टच्या अध्यक्षांचा निर्वाळा!!

वृत्तसंस्था

अयोध्या : अयोध्येतील श्रीराम जन्मभूमीवरील मंदिराचे बांधकाम पूर्ण झाले नसल्यामुळे त्याचे 22 जानेवारी रोजी श्री रामलल्लांची प्राणप्रतिष्ठा करणे सनातन धर्मशास्त्राच्या विरोधात आहे, अशी भूमिका शंकराचार्यांनी घेतल्यानंतर हिंदू समाजात विविध गैरसमज पसरले. हे गैरसमज राम जन्मभूमी ट्रस्टचे अध्यक्ष आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींचे माजी मुख्य सचिव नृपेंद्र मिश्रा यांनी पूर्णपणे खोडून काढले.The construction of the main 5 mandapams of the Ram temple is complete, Ramlalla’s pranapratistha is fully scriptural; President of Ram Janmabhoomi Trust is dead!!

राम मंदिराचे मुख्य 5 मंडपाचे बांधकाम पूर्ण झाले आहे तिथल्याच गर्भगृहामध्ये श्री रामलल्लांची मूर्ती प्रतिष्ठित करून त्याची 22 जानेवारीच्या सुमुहूर्तावर प्राणप्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. यात कोणताही संदेह नाही किंवा धर्मशास्त्राचाही विरोध नाही. राम मंदिराच्या तळमजल्याचे म्हणजेच 5 मंडपांचे आणि गर्भगृहाचे बांधकाम पूर्ण झाल्याने तेथे मूर्ती प्रतिष्ठापना करण्यात सनातन शास्त्राचे उल्लंघन नाही, पण काही लोक समजत असूनही आपण नासमज आहोत असे दाखवतात आणि गैरसमज पसरवतात. पण श्री रामलल्लांच्या प्राणप्रतिष्ठापना विधीमध्ये काहीही अशास्त्रीय घडलेले नाही. घडणार नाही, असा निर्वाळा नृपेंद्र मिश्रा यांनी दिला.



राम मंदिराच्या पहिल्या मजल्यावर राम दरबार असणार आहे. तेथे श्रीरामांबरोबरच सीतामाई त्यांचे सर्व बंधू तसेच त्यांचे परम सेवक श्री हनुमान यांच्या मूर्ती असतील. या मजल्याचे बांधकाम प्रगतीपथावर आहे, तसेच दुसऱ्या मजल्यावर यज्ञशाळा असून तिथे विविध प्रकारचे यज्ञ होणार आहेत. त्याचेही बांधकाम प्रगतीपथावर आहे. त्यामुळे बांधकाम अपूर्ण असताना तिथे रामलल्लांची प्राणप्रतिष्ठा होते हे म्हणणे चूक आहे. कारण पूर्वीच्या काळी कुठलीही मोठ्या मंदिरांचे बांधकाम 50 वर्षांपेक्षा अधिक काळ चालत असे. त्यावेळी ते बांधकाम पूर्ण होईपर्यंत देवप्रतिष्ठापना थांबवली जात नसे. गर्भगृहाचे बांधकाम पूर्ण झाल्यावर तिथे देव प्रतिष्ठापना करून पूजाअर्चा सुरू केली जात असे आणि मगच मंदिराचे काम यथावकाश पूर्ण होत असे. हे अनेक वर्ष घडले आहे, यात विशेष काही नाही, असा स्पष्ट खुलासा नृपेंद्र मिश्रा यांनी केला.

 कोण आहेत नृपेंद्र मिश्रा??

राम जन्मभूमी संदर्भातला निकाल देताना सुप्रीम कोर्टाने श्रीराम जन्मभूमी ट्रस्ट स्थापन करण्याचे आदेश दिले होते. त्या सूचनेनंतरच केंद्र सरकारने तो ट्रस्ट नेमून नृपेंद्र मिश्रा यांची अध्यक्षपदी नेमणूक केली. ते श्रीराम जन्मभूमी ट्रस्टचे अध्यक्ष आहेत. ट्रस्टच्या अध्यक्षपदी येण्यापूर्वी ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मुख्य सचिव होते. पंतप्रधान मोदींबरोबर त्यांनी 10 वर्षांहून अधिक काळ काम केले आहे. नृपेंद्र मिश्रा यांच्याच मुख्य मार्गदर्शनाखाली अयोध्येतील श्री राम जन्मभूमी ट्रस्टने सुप्रीम कोर्टाने बहाल केलेल्या 2.77 एकर जमिनी लगतच 67 एकर जमीन खरेदी करून मंदिराचा विस्तारित आराखडा तयार केला. आता त्या जमिनीवरच मंदिराचे बांधकाम झाले आहे.

The construction of the main 5 mandapams of the Ram temple is complete, Ramlalla’s pranapratistha is fully scriptural; President of Ram Janmabhoomi Trust is dead!!

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात