‘आम्ही लाठ्या खात होतो त्यावेळी तुम्ही कुठेतरी फोटो काढत होतात’ ; फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना टोला!

छातीठोकपणे सांगतो माझा परिचय श्री राम सेवक आणि कार सेवक आहे – देवेंद्र फडणवीस


विशेष प्रतिनिधी

ठाणे : श्री रामजन्मभूमी आंदोलनात सहभागी झालेल्या कारसेवकांचा सन्मान करण्याच्या कार्यक्रमात रविवारी ठाणे येथे कारसेवकांचा सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच यावेळी जगद्गुरू दिनेशाचार्य जी महाराज, पूज्य शशिकांत जी महाराज, मा. केंद्रीय मंत्री कपिल पाटील जी, श्वेता शालिनी तसेच मोठ्या संख्येने श्रोते व श्री राम भक्त उपस्थित होते.When we were eating sticks you were taking pictures somewhere Fadnavis to Uddhav Thackeray

याप्रसंगी देवेंद्र फडणवीस म्हणाले, ‘हा काळ आपल्या सर्वांसाठी खूप आनंदाचा आहे, श्रीराम भक्तांनी 500 वर्षे याची वाट पाहिली. ही 500 वर्षांची बाबरीची ढाच्याची सल वेदनादायक होती. प्रत्येकाची इच्छा होती की आपल्या प्रभू श्री रामजींचे जन्मस्थान आपल्याला मिळावे. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची मशाल पेटवली. स्वभाषा, स्वधर्म आणि स्वराज्याचा नारा दिला. देव, देश आणि धर्मासाठी झटण्याचे बळ त्यांनी दिले.’



याचबरोबर ‘मुघलांनी जिथे जिथे आपल्या श्रद्धेची प्रतीके नष्ट केली होती, तिथे महाराणी अहिल्याबाई होळकर यांनी देशभरात त्यांची पुनर्स्थापना करण्याचे काम केले. असे असूनही बाबरी ढाच्याची सल मनात रुतून राहिली होती. यानंतर एक आंदोलन सुरू झाले आणि 6 डिसेंबर 1992 रोजी कलंकाची आणि गुलामीचे प्रतीक असलेली ही वास्तू पाडल आणि रात्रभरात राम लल्लाचे मंदिर बांधण्यात आले. तरीही प्रभू श्रीराम एका छोट्या मंदिरात बसले होते याची रुखरुख मनात होती. आमचा नारा होता ‘राम लल्ला हम आयेंगे और मंदिर भव्य बनायेंगे!’ असंही ते म्हणाले.

याशिवाय ‘आता वेळ आली आहे, 22 जानेवारीला श्री रामजी पुन्हा एकदा आपल्या जागेवर विराजमान होणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते श्री राम मंदिरात प्राणप्रतिष्ठा कार्यक्रम संपन्न होणार आहे. महाराष्ट्रातील काही लोक ‘मंदिर वहीं बनायेंगे, तारीख़ नहीं बतायेंगे’ म्हणून हिणवायचे. त्यांना सांगतो भगवान श्री रामाचे मंदिर बनले आहे आणि तुम्हाला 22 जानेवारीला जायचे असेल, तर जा पण आत जायची आणि रामलल्लाच्या नजरेला नजर मिळवण्याची हिंमत कुठून आणणार?’ असा फडणवीसांनी सवालही केला.

याबरोबर ‘उद्धव ठाकरे यांना मी सांगू इच्छितो, जेव्हा कारसेवा झाली तेव्हा मी 20 वर्षांचा होतो. त्यावेळी ‘लाठी गोली खाएँगे मंदिर वहीं बनायेंगे’ अशा घोषणा देत होतो. त्यावेळी तुम्ही कुठेतरी फोटो काढत होतात. उद्धव ठाकरे, तुमच्यासोबतचा एक तरी नेता दाखवा जो कारसेवक राहिला असेल? आम्ही सगळे तेथे होतो. अनेक राज्यांच्या सरकारांना लाथ मारली. उद्धव ठाकरे तुम्ही म्हणालात की बाबरी माझ्या वजनाने पडली असती, अहो, श्रीरामाचा भक्त हिमालयालाही हादरवू शकतो, बाबरी काय आहे त्यासमोर? ज्यांनी रामजन्मभूमीसाठी झटलेल्या कोठारी बंधूंना शहीद केले. त्याच्या मांडीला मंडी लाऊन बसलेल्या राजकीय हिंदूंनी आम्हाला हिंदुत्व सांगू नये!’ असे टीकास्त्र फडणवीसांनी सोडले.

‘ठाणे ही धर्माची नगरी असुनही इथे काही अधर्मी लोक राहतात. जे देव काय खात होते हे सांगत बसतात, अशा अधर्मी लोकांकडे लक्ष देऊ नये. आपण सर्वांनी या 22 जानेवारीला रामलल्लाच्या आगमनाची अशी तयारी करावी की सर्व जगाला समजेल की आपले राजा श्री रामचंद्रजी पुन्हा एकदा आपल्या स्थानी विराजमान होत आहेत.’

When we were eating sticks you were taking pictures somewhere Fadnavis to Uddhav Thackeray

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात