INDI आघाडीच्या बैठका 5 स्टार हॉटेल मधून व्हिडिओ कॉन्फरन्स वर आल्या; पण जागावाटपाचा निघेना फॉर्म्युला!!

INDI Leading Meetings Video Conference from 5 Star Hotel

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : INDI आघाडीच्या बैठका 5 स्टार हॉटेल मधून व्हिडिओ कॉन्फरन्स वर आल्या,ङ पण जागा वाटपाचा निघेना फॉर्म्युला!!, अशी म्हणायची वेळ आघाडीतल्या नेत्यांनी आणली आहे. INDI आघाडीच्या 4 वेगवेगळ्या महाबैठका पाटणा, बेंगलोर, मुंबई आणि नवी दिल्ली या 4 शहरांमध्ये 5 स्टार हॉटेलमध्ये झाल्या. त्यावेळी प्रत्येक वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकार विरुद्ध लढण्याचा मोठ्या आवाजात निर्धार करण्यात आला. परंतु, त्यापैकी एकाही बैठकीत आघाडीतले प्रत्येक राज्यातली जागावाटप याविषयी शाब्दिक बुडबुड्यांखेरीज दुसरे काहीही काढण्यात आले नाही.  INDI Leading Meetings Video Conference from 5 Star Hotel

आता तर वेगवेगळ्या शहरांमध्ये 5 स्टार हॉटेलमध्ये जाऊन बैठका घेण्याला आघाडीतले नेतेच कंटाळले आणि आज आघाडीतल्या सर्व नेत्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारे आघाडीची बैठक घेतली. या बैठकीत देखील सगळे नेते उपस्थित राहिलेच नाहीत. ममता बॅनर्जींनी या बैठकीवर बहिष्कार घातला. त्यांनी तर पश्चिम बंगालमधल्या काँग्रेसच्या नेत्यांना भेटायलाही नकार दिला. उद्धव ठाकरेंनी आपला नियोजित कल्याण दौरा असल्याने बैठकीत सामील होऊ शकणार नाही, असे आघाडीतल्या नेत्यांना कळवून टाकले. सोनिया गांधी बैठकीत सामील झाल्या नाहीत त्यामुळे राहुल गांधी आणि शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीतच ही बैठक पार पाडावी लागली.

त्यातही INDI आघाडीच्या संयोजक पदाच्या निर्णयाला ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसने खोडा घातला. त्यांना INDI आघाडीच्या संयोजक पदी नितीश कुमार नको आहेत. त्यामुळे त्याचाही निर्णय व्हिडिओ कॉन्फरन्सच्या बैठकीत झाला नाही. व्हिडिओ कॉन्फरन्स झाल्याच्या बातम्या वेगवेगळे फोटो काढून माध्यमांनी दिल्या. या बैठकीत देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकार विरुद्ध लढण्याचा मोठ्या आवाजात निर्धार करण्यात आला, पण आघाडीचे प्रत्येक राज्यातले जागावाटप याविषयी शाब्दिक बुडबुड्यांखेरीज प्रत्यक्ष ठोस कृती कुठलीच करण्यात आली नाही.

INDI Leading Meetings Video Conference from 5 Star Hotel

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात