विशेष प्रतिनिधी
नाशिक : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नाशिकमध्ये २७ व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाला हजेरी लावली. यावेळी मोदी म्हणाले की, अमृत काल ही तरुणांसाठी सुवर्णसंधी आहे. जगातील पाच मोठ्या अर्थव्यवस्थांमध्ये भारताचा समावेश झाला आहे, ही भारतातील तरुणांची ताकद आहे. Prime Minister Modis appeal to the youth to carry out cleanliness drives at pilgrimage sites
तरुणांना इतिहास घडवण्याची संधी आहे. तसेच मोदींनी तरुणांना 22 जानेवारीपर्यंत तीर्थक्षेत्रांमध्ये स्वच्छता मोहीम राबवण्याचे आवाहन केले. 22 जानेवारीला अयोध्येत राम लल्लाच्या अभिषेकचा कार्यक्रम आहे.
‘राष्ट्रीय युवा दिना’च्या शुभेच्छा देताना मोदी म्हणाले, “आज भारताच्या युवा शक्तीचा दिवस आहे. हा दिवस त्या महापुरुषाला समर्पित आहे ज्यांनी गुलामगिरीच्या काळात भारताला नवीन ऊर्जा दिली. हे माझे भाग्य आहे की स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त, मी नाशिकमध्ये तुम्हा सर्व तरुणांमध्ये आहे. मी तुम्हा सर्वांना ‘राष्ट्रीय युवा दिनाच्या’ शुभेच्छा देतो. भारत जगातील पाच सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थांमध्ये आला आहे, ही भारतातील तरुणांची ताकद आहे. ”
पंतप्रधान मोदी म्हणाले, “मी 22 जानेवारीपर्यंत आपण सर्वांनी देशातील तीर्थक्षेत्रे आणि मंदिरे स्वच्छ करू, स्वच्छता मोहीम राबवू, असे आवाहन केले होते. आज मला काळाराम मंदिरात जाऊन मंदिर परिसर स्वच्छ करण्याचे सौभाग्य लाभले. मी पुन्हा सांगतो. माझी देशवासियांना विनंती आहे की त्यांनी देशातील सर्व मंदिरे आणि तीर्थक्षेत्रांमध्ये स्वच्छता मोहीम राबवावी आणि राम मंदिरात प्राणप्रतिष्ठा होण्याच्या शुभ मुहूर्तावर आपले श्रम दान करावेत.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App