तुरुंगात असलेले संजय सिंह पुन्हा खासदार होणार
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : दिल्ली-पंजाबची सत्ताधारी आम आदमी पार्टी स्वाती मालीवाल यांना राज्यसभेवर पाठवणार आहे. याशिवाय तुरुंगात असलेले संजय सिंह पुन्हा राज्यसभेचे खासदार होणार आहेत. ‘आप’ने तिसरा उमेदवार म्हणून एनडी गुप्ता यांची निवड केली आहे. राज्यसभा खासदार म्हणून त्यांची ही दुसरी टर्म असेल.AAP will send Swati Maliwal to Rajya Sabha for the first time
वास्तविक, दिल्लीतील तिन्ही राज्यसभा खासदारांचा कार्यकाळ २७ जानेवारीला संपत आहे. या जागांसाठी १९ जानेवारीला निवडणूक होणार आहे. याआधी आम आदमी पक्षाने तिन्ही जागांवर आपले उमेदवार जाहीर केले. नामांकनाची अंतिम तारीख १० जानेवारी आहे.
AAPच्या राजकीय घडामोडी समितीने (PAC) दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालीवाल यांना राज्यसभा निवडणुकीसाठी उमेदवार म्हणून नामांकित केले आहे. याशिवाय संजय सिंह आणि एनडी गुप्ता यांना दुसऱ्यांदा राज्यसभेचे खासदार म्हणून कायम ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
दिल्लीतील तीनही जागांवर आम आदमी पक्षाचे नियंत्रण आहे. सध्या संजय सिंह, सुशील कुमार गुप्ता आणि एनडी गुप्ता हे राज्यसभेचे खासदार आहेत. पण पक्षाने आता सुशील गुप्ता यांच्या जागी स्वाती मालीवाल यांना राज्यसभेवर पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. सुशील कुमार गुप्ता यांनी हरियाणाच्या निवडणुकीच्या राजकारणात उतरण्याची इच्छा व्यक्त केली होती, त्यामुळे पक्षाने त्यांना उमेदवारी दिलेली नाही.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App