दमदाटी करणे हा अजितदादांचा स्वभाव, पण लोक यमाला घाबरत नाहीत, तर त्यांना काय घाबरणार??; आव्हाडांचे प्रत्युत्तर

प्रतिनिधी

मुंबई : दमदाटी करणे हा अजितदादांचा स्वभाव आहे. पण लोक यमाला घाबरत नाहीत, तर त्यांना काय घाबरणार??, असे म्हणत जितेंद्र आव्हाडांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना आज प्रत्युत्तर दिले. Ajitdad’s nature is to be bold, but if people are not afraid of Yama, what will they be afraid of

अजित पवार – अमोल कोल्हे वादात जितेंद्र आव्हाडांनी अजितदादांवर निशाणा साधला.

जितेंद्र आव्हाड म्हणाले

प्रफुल्ल पटेलांनी भविष्य वर्तवलेय घड्याळ आम्हालाच मिळणार, तेव्हा आम्ही निवडणूक आयोगाकडे तक्रार केली. निवडणूक आयोगाने दोघांच्या वकिलांसमोर सांगितले की, आमच्याबद्दल म्हणजे निवडणूक आयोगाबद्दल कोणी भविष्य वर्तवू नका. आम्ही कधीच बोलत नाही की, पक्ष-चिन्ह आम्हालाच मिळणार. निवडणूक आयोग एक स्वायत्त संस्था आहे. त्यांना त्यांचे अधिकार आहेत. त्यांच्या निर्णयाबद्दल बोलण चुकीचच आहे.

दुसऱ्याच्या घरात डोकावायच नसतं. त्यांच्या घरात काय चाललय? भांडण चालू आहे का? आम्हाला काय करायचय? आम्ही आमचा संसार बघू. भाजपा दोघांना घरचा रस्ता दाखवणार आहे. शिंदे आणि अजितदादा गट दोघांना कमळाच्या चिन्हावर निडवणूक लढवावी लागणार आहे.

अजितदादांनी सांगितलय की, घड्याळाच्या चिन्हावर निवडणूक लढवू, पण वक्त आने पर सब सामने आयोगा. अमोल कोल्हे बाबतीत कसा निवडून येतो ते बघतोच, असे अजितदादा म्हणाले, पण दमदाटी करण हा अजितदादांचा स्वभाव दोष आहे. पवार साहेबांच्या राजीनाम्याच्या दिवशी मी बघितलं, ए तू गप, तू गप, असे ते करत होते. हे असं नाही चालत. तुम्ही घरी नाहीय. तुम्ही सार्वजनिक जीवनात आहात. प्रत्येकाला मानसन्मान असतो. त्यामुळे मी त्यांच्यापासून लांबच रहायचो.

पाडून दाखवतो म्हणणारी मोठी माणस आहेत. ते कोणालाही पाडू शकतात. ते 48 च्या 48 जागा निवडणूक आणू शकतात. अमोल कोल्हे 27 ते 30 पर्यंत शेतकरी आक्रोश मोर्चा काढणार आहेत. अमोल कोल्हेंना टॅकल करण्यासाठी अजित पवार आक्रमक झाले असतील, तर प्रत्येकाला घाबरवणं कोणाला शक्य होत नाही. या जगात लोक यमालाही घाबरत नाहीत, तो कधीतरी येणारच आहे, तर बाकीच्यांना काय घाबरायच??

Ajitdad’s nature is to be bold, but if people are not afraid of Yama, what will they be afraid of

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात