विशेष प्रतिनिधी
सातारा : महाराष्ट्र राज्य सहकारी शिखर बँकेच्या 25 हजार कोटी रुपयांच्या घोटाळ्यात उपमुख्यमंत्री अजित पवार पुढच्या 4 महिन्यांत राज्याचे तुरुंगात असतील, असा दावा माजी मंत्री शालिनीताई पाटील यांनी केला. पण त्यावेळी त्याच घोटाळ्यात आरोप असलेले शरद पवार नेमके कुठे असतील??, असा सवाल तयार झाला आहे.Ajitdada in Jail in 4 Months in Rajya Shikhar Bank Scam, Shalinitai Claims; But then where will Pawar be??
2024 मध्ये लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका आहेत. मात्र, अजित पवार कुठूनही उभे राहू शकणार नाहीत. त्यांना निवडणूकच लढवता येणार नाही कारण त्यावेळी ते तुरूंगात असतील असा थेट दावा शालिनीताई पाटील यांनी केला. शालिनीताई म्हणाल्या की, आपण अजितदादांविरोधात एकूण 3 अर्ज दाखल करणार असून पुढील 10 दिवसात ते उच्च न्यायालयात दाखल केले जाणार आहेत. त्यानंतर पुढील 3 ते 4 महिन्यात अजितदादा तुरुंगाची हाव खात असतील. 5 वर्षे फुकट गेल्यामुळे हे प्रकरण फास्टट्रॅक कोर्टात घेण्याची विनंती आम्ही न्यायालयाला करणार असल्याचेही पाटील यांनी स्पष्ट केले.
विश्वासघात न करणारे फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार
अजितदादा तुरूंगात जाण्याच्या दावा करणाऱ्या शालिनीताईंनी फडणवीसांबाबत मोठा दावा केला आहे. त्या म्हणाल्या की, अजित पवार तुरूंगात जातील. त्यानंतर पक्षाशी कधीही विश्वासघात न करणारे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रीपदी विराजमान होतील, असा खळबळजनक दावाही पाटील यांनी केला आहे.
अजित पवार घोटाळ्यातील मुख्य सूत्रधार
पुढे बोलताना शालिनीताई म्हणाल्या की, उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार अजित पवार शिखर बँकेच्या 25 हजार कोटींच्या घोटाळ्यातील मुख्य सुत्रधार आहेत. त्यामुळे राज्याच्या मुख्य सचिवांकडे अजितदादांविरोधात चार्जशीट दाखल करून त्यांना न्यायालयात हजर करण्याची मागणी करणार असल्याचे त्या म्हणाल्या. याशिवाय हा खटला फास्ट ट्रॅकवर चालवण्याची विनंतीदेखील आपण करणार असल्याचे शालिनीताईंनी यावेळी सांगितले.
माझ्या संस्थेची मालमत्ता ईडीच्या ताब्यत आहे. त्यामुळे आता त्यांनी जप्त केलेली मालमत्ता आमच्या ताब्यात द्यावी आम्ही कारखाना चालवू असे म्हणत मालमत्ता परत देण्याची मागणी पाटील यांनी बोलताना केली आहे. ईडी ही संस्था केंद्राच्या अखत्यारित असल्याचे म्हणत आपला मोदींवर विश्वास राहिलेला नाही.
शिंदे – फडणवीस सरकार व्यवस्थित चाललेलं असताना तुम्ही पक्ष फोडायची सुपारी देत अजितदादांना सोबत घेत त्यांना उपमुख्यमंत्री केलं असा थेट आरोप शालिनीताई पाटलांनी भाजपवर केला. हे सुपारीचे राजकारण आम्हाला पसंत नाही, असे शालिनीताई म्हणाल्या.
पण ज्या महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळ्यात अजित पवार यांच्यावर 420 कलमांतर्गत गुन्हा दाखल आहे, त्याच घोटाळ्यात शरद पवार यांच्यावर 120 (ब) या कलमांतर्गत गुन्हा दाखल आहे. त्यामुळे शालिनीताई पाटलांच्या कोर्टातल्या अर्जानुसार अजित पवार जर पुढच्या 4 महिन्यांत या घोटाळ्यात तुरुंगात गेले, तर शरद पवार त्यावेळी कुठे असतील??, असा सवाल तयार झाला आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App