विशेष प्रतिनिधी
मुंबई : लोकसभा निवडणुका तोंडावर येऊनही प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीला अजूनही महाविकास आघाडीत स्थान देत नसलेल्या नेत्यांना प्रकाश आंबेडकर यांनी जबरदस्त टोला हाणला आहे. Prakash ambedkar targets MVA leaders for not quarrel over seat sharing
तुम्ही स्वतःचेच पक्ष वाढवायचा फंदात पडलात, तर मोदीच तुमच्या बोकांडी बसतील. थोडा त्याग करा. तुमच्या पक्षाला 2 – 3 जागा कमी मिळाल्या, तर फरक पडत नाही, अशा शब्दांमध्ये प्रकाश आंबेडकर यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांना झापले. तुम्हाला स्वतःचा पक्ष वाढवायचा आहे की मोदी घालवायचाय??, असा बोचरा सवाल प्रकाश आंबेडकरांनी केला.
जागा वाटपाचा विषय गांभीर्याने घ्या. पण मतभेद आणि भांडणापेक्षा मोदींविरोधात लढा उभा करायला हवा, अशी सूचना प्रकाश आबंडेकरांनी केली. वंचित बहुजन आघाडीतर्फे मनुस्मृती दिनानिमित्त सोमवारी नागपुरातील कस्तुरचंद पार्कवर स्त्रीमुक्ती दिन परिषदेचे आयोजन केले होते. यावेळी ते बोलत होते.
कोणी म्हणतंय मी 23 जागा लढेन, कोणी म्हणतंय अमुक जागा लढवेन. आम्ही त्यांना म्हणतोय पहिल्यांदा जागा सोडा. पक्ष वाढवायचा आहे की मोदी घालवायचा आहे?” असा सवाल प्रकाश आंबेडकरांनी महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीला विचारला आहे.
मोदी घालवायचा असेल तर तुमच्या वाट्याला 2 – 4 जागा कमी आल्या तरी चालतील, ही भूमिका असली पाहिजे. नाहीतर आम्हाला एवढ्याच जागा पाहिजेत, या भूमिकेवर अडून राहिलात, तर मोदी तुमच्या बोकांडी बसल्याशिवाय राहणार नाही. अन् तुम्ही तिहार जेलमध्ये गेल्याशिवाय राहणार नाही, असा टोलाही आंबेडकरांनी लगावला.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App