विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : NewsClick वेब पोर्टल मनी लॉन्ड्रिग प्रकरणात पोर्टलचे HR प्रमुख अमित चक्रवर्ती यांनी माफीचा साक्षीदार बनायची तयारी दाखवली आहे त्यासाठी त्यांनी स्वतःच न्यायालयात अर्ज केला आहे. NewsClick case Accused HR head Amit Chakravarty moves court to turn approver
NewsClick क्लिकने चिनी कम्युनिस्ट पार्टीचा प्रोपोगांडा स्पेशललिस्ट नेव्हिल रॉय सिंघम याच्याकडून 38 कोटी रुपये मिळवले होते हे सर्व पैसे मनी लॉन्ड्री मधूनच जमा झाल्याचे तपासात आढळले आणि त्यानंतरच अमित चक्रवर्तीने माफीचा साक्षीदार बनण्याचा निर्णय घेतला आहे.
दिल्ली न्यायालयाने यापूर्वी न्यूजक्लिक – चायनीज प्रोपगंडा प्रकरणाचा तपास पूर्ण करण्यासाठी दिल्ली पोलिसांना 60 दिवसांची मुदतवाढ दिली होती. NewsClick चे HR प्रमुख अमित चक्रवर्ती यांनी सोमवारी दिल्ली न्यायालयात NewsClick चे काही कारणांनी सांगितले चिनी एजंट कडून पैसे घेऊन NewsClick वेब पोर्टलने भारत विरोधी प्रचार केला भारताच्या सार्वभौमत्वाला धोका निर्माण होईल, असा नॅरेटिव्ह तयार केला. याच प्रकरणात अमित चक्रवर्ती यांनी माफीचा साक्षीदार बनवण्याचा अर्ज पटियाला हाऊस कोर्टाला सादर केला.
पटियाला हाऊस कोर्टाने अमित चक्रवर्ती आणि न्यूज पोर्टलचे संस्थापक प्रबीर पुरकायस्थ यांच्याविरुद्धच्या खटल्याचा तपास पूर्ण करण्यासाठी दिल्ली पोलिसांना 60 दिवसांची न्यायालयीन कोठडी वाढवल्यानंतर ही महत्त्वपूर्ण घडामोड घडली आहे.
दिल्ली पोलिसांनी न्यूज पोर्टलशी संबंधित पत्रकारांच्या निवासस्थानांसह अनेक ठिकाणी छापे घातल्यानंतर ऑक्टोबर 2023 मध्ये संस्थापक आणि एचआर प्रमुख दोघांनाही अटक करण्यात आली होती. त्यांच्यावर बेकायदेशीर क्रियाकलाप (प्रतिबंध) कायदा (UAPA) अंतर्गत दहशतवादाचा आरोप ठेवण्यात आला होता.
दरम्यान, अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) फर्मच्या जागेवरही झडती घेतली. केंद्रीय अन्वेषण ब्युरो (सीबीआय) द्वारे फॉरेन कॉन्ट्रिब्युशन रेग्युलेशन अॅक्ट (FCRA) अंतर्गत गुन्हा देखील दाखल केला आहे. न्यूयॉर्क टाईम्सच्या अहवालानंतर या प्रकरणाचा तपास दिल्ली पोलिसांनी केला.
*न्यूज़क्लिकला अमेरिकेतील मिलेनियर नेव्हिल रॉय सिंघमकडून ₹ 38 कोटी दिल्याचे उघड झाले होते. नेव्हिल रॉय सिंघम हा चिनी कम्युनिस्ट पार्टीच्या CPC आंतरराष्ट्रीय प्रचार शाखेची संबंधित आहे. त्याने 38 कोटींची रक्कम न्यूज क्लिकला दिल्याने न्यूज क्लिपच्या तटस्थ विषयी दाट शंका निर्माण झाली आणि तो तपास अधिक खोलवर जातUAPA कायद्यांतर्गत न्यूज क्लिकवर करण्याची वेळ दिल्ली पोलिसांवर आली आता याच प्रकरणात न्यूज क्लिकचा एचआर हेड अमित चक्रवर्ती याने माफीचा साक्षीदार म्हणून न्यूज क्लिकची पूर्ती पोलखोल करण्याचा निर्णय घेतला आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App