बेरोजगार आहात म्हणून लोकसभेत उड्या माराल का??, राहुल गांधींकडे बोलायला दुसरे विषयच नाहीत; नारायण राणेंचा टोला

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : बेरोजगारीच्या नावाखाली युवकांनी संसदेत घुसखोरी केली. त्या घुसखोरीचे राहुल गांधी यांनी समर्थन केले. मात्र केंद्रीय मंत्री नारायण राणे या मुद्द्यावरून टीका केली आहे. Rahul Gandhi has no other topics to talk about; Narayan Rane

बेरोजगारी आहे म्हणून तुम्ही लोकसभेत उड्या टाकाल का??, वैध मार्गाने प्रश्न मांडता येत नाहीत का??, असा बोचरा सवाल त्यांनी केला. त्याचवेळी राहुल गांधींकडे दुसरा कोणता विषय बोलायला नसल्याची टीकाही त्यांनी केली.

संसदेतल्या घुसखोरीचे काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी समर्थन केले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या धोरणामुळे देशात बेरोजगार आणि महागाई वाढली. या बेरोजगारी आणि महागाई या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठीच या तरुणांनी हे कृत्य केले, असा दावा राहुल गांधींनी केला.

राहुल गांधी यांच्या प्रतिक्रियेबाबत नारायण राणे यांना विचारले असता ते म्हणाले, “राहुल गांधी यांच्याकडे आता बोलण्यासाठी कोणताही विषय नाही. बेरोजगार आहे म्हणून आता सर्वांनी लोकसभेत येऊन उड्या मारायच्या का?? लोकशाहीत आपले म्हणणे मांडण्याचे इतरही पर्याय आहेत. आपले प्रश्न मांडण्यासाठी इतरही विधायक मार्ग आहेत. त्याचा अवलंब न करता थेट लोकसभेत येऊन उड्या मारणे योग्य नाही. आपल्यावलोकशाही देशात विरोधी पक्षांनी देखील असल्या प्रकारचे समर्थन करणे योग्य नाही, असे परखड मत नारायण राणे यांनी एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना व्यक्त केले.

Rahul Gandhi has no other topics to talk about; Narayan Rane

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात