वृत्तसंस्था
नवी दिल्ली : संसद भवनाची सुरक्षा भंग करणाऱ्या आरोपीचे राजस्थानशी कनेक्शन समोर आले आहे. दिल्ली पोलिसांच्या माहितीनुसार, नागौर जिल्ह्यात आरोपींचे फोन जळालेले आढळले आहेत. मुख्य आरोपी ललित झा याच्या सांगण्यावरून आगीत जळालेले फोन जप्त करण्यात आले आहेत. पुढील तपास करण्यात येत आहे.An important clue to Delhi Police in Parliament intrusion case, burnt mobile phone seized from Rajasthan
मिळालेल्या माहितीनुसार, दिल्ली पोलीस आरोपींच्या कनेक्शनचा तपास करत होते. गेल्या अनेक दिवसांपासून आरोपींच्या मोबाईलची माहिती गोळा करत होते. मुख्य आरोपी ललित झा याच्या सांगण्यावरून दिल्ली पोलीस नागौरला पोहोचले, पण तिथे जे काही मिळाले ते जळालेल्या अवस्थेत सापडले. आरोपींचे मोबाईल जाळण्यात आले. दिल्ली पोलिसांनी आरोपींकडून मोबाईलचे पार्ट्स जप्त केले आहेत. पोलिस पुराव्याच्या आधारे माहिती गोळा करत आहेत.
मुख्य आरोपी ललित झा याच्याकडे इतर सर्व आरोपींचे मोबाईल फोन असल्याचे दिल्ली पोलिसांनी म्हटले आहे. त्याने आधी सर्व मोबाईल फोडले आणि नंतर ते पेटवून दिले. आरोपींचे राजस्थानशी काय संबंध होते आणि ते नागौरमध्ये का होते आणि त्यांना कोणाकडून पाठबळ मिळत होते, या सर्व अंगांनी पोलीस तपास करत आहेत. मोबाईल रिकव्हर झाल्यानंतर अनेक महत्त्वाची गुपिते उघड होऊ शकतात, असे सांगण्यात येत आहे.
Parliament Security Breach | According to the Police, phone parts of all the accused have been recovered from Rajasthan. All the phones were found in burnt condition. Lalit Jha had the phones of all the accused: Delhi Police Sources pic.twitter.com/8i08wkLc0N — ANI (@ANI) December 17, 2023
Parliament Security Breach | According to the Police, phone parts of all the accused have been recovered from Rajasthan. All the phones were found in burnt condition. Lalit Jha had the phones of all the accused: Delhi Police Sources pic.twitter.com/8i08wkLc0N
— ANI (@ANI) December 17, 2023
नुकतेच संसदेच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान काही तरुणांनी प्रेक्षक गॅलरीतून संसदेच्या सुरक्षेचा भंग करत सभागृहात उडी घेतली होती. त्यांच्यासोबत रंगीत स्मोक बॉम्बही होते. मुख्य आरोपी ललित झा याच्या माहितीवरून इतर आरोपींना अटक करण्यात आली आहे. पुढील तपास करण्यात येत आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App