विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : संसदेच्या सुरक्षा भंगाच्या प्रकरणाने जोर पकडला आहे. विरोधी पक्षाचे खासदार संसदेच्या सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्न उपस्थित करत आहेत. दरम्यान, गृहमंत्रालयाने या संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. मंत्रालयाने चौकशी समिती स्थापन केली आहे.SIT established by Ministry of Home Affairs in case of breach of Parliament security
सीआरपीएफचे डीजी अनिश दयाल सिंग या समितीचे नेतृत्व करणार आहेत. लोकसभा सचिवालयाने गृहमंत्रालयाला संसदेच्या सुरक्षेतील त्रुटीची चौकशी करण्यास सांगितले होते.
संसदेचे हिवाळी अधिवेशन असताना बुधवारी दोन तरूण थेट संसद सभागृहात शिरले होते. एवढंच नाही तर त्यांनी सभागृहात स्मोक कँडलही पेटवल्या होत्या. यामुळे उपस्थित खासदारांमध्येही एकच गोंधळ उडाला आणि सभागृहात धूरमय वातावरण झाले होते. या घटनेमुळे संसदेच्या सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्न चिन्ह उपस्थित झाले आहे.
मंत्रालयाने सांगितले की, “लोकसभा महासचिवांच्या पत्रावर गृह मंत्रालयाने सीआरपीएफचे डीजी अनिश दयाल सिंह यांच्या अध्यक्षतेखाली एसआयटी स्थापन केली आहे.” त्यात इतर सुरक्षा यंत्रणांचे अधिकारी सदस्य म्हणून सहभागी होतील.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App