पाक लष्करी तळावरील हल्ल्याचा अफगाणिस्तानवर संशय; अफगाणी राजदूताला समन्स; तपासात मदत करण्याचे आवाहन

वृत्तसंस्था

इस्लामाबाद : पाकिस्तानमधील लष्करी तळावर मंगळवारी झालेल्या हल्ल्याचा संबंध अफगाणिस्तानात उपस्थित असलेल्या तालिबानी दहशतवाद्यांशी जोडला जात आहे. पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने या प्रकरणी इस्लामाबादमध्ये उपस्थित तालिबान सरकारचे राजदूत सरदार अहमद साकिब यांना बोलावून घेतले. या हल्ल्याचा निषेध करत अफगाणिस्तानच्या तालिबान सरकारने तपासात मदत करावी, असे त्यांना सांगण्यात आले. या हल्ल्यात 23 पाकिस्तानी सैनिक मारले गेले. Afghanistan suspected of attack on Pak military base

पाकिस्तानातील खैबर पख्तुनख्वा येथील डेरा इस्माईल खान लष्करी तळावर आत्मघाती हल्ला झाला. 11 आणि 12 डिसेंबरच्या मध्यरात्री पहाटे तीनच्या सुमारास हा हल्ला झाला. यामध्ये 23 जवान शहीद झाले. हल्ल्याच्या वेळी बहुतांश सैनिक झोपले होते. पाकिस्तानी लष्कराची मीडिया शाखा इंटर-सर्व्हिसेस पब्लिक रिलेशन्स (ISPR) नेही हल्ल्याची पुष्टी केली.


अफगाणिस्तानने दिल्लीतील दूतावास कायमचा बंद केला, जाणून घ्या का घेतला हा मोठा निर्णय!


मिळालेल्या माहितीनुसार, लष्कराने सुरुवातीला दहशतवाद्यांच्या लष्करी चौकीत घुसण्याचा प्रयत्न केला होता. तो हाणून पाडण्यात आला. यानंतर दहशतवादी स्फोटकांनी भरलेले वाहन घेऊन बेस कॅम्पमध्ये घुसले.

पाकिस्तानी सैन्याने सर्व 6 दहशतवाद्यांचा खात्मा केला. तहरीक-ए-जिहाद पाकिस्तान (TJP) या दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्विकारली आहे. हे एक नवीन नाव आहे, परंतु तेहरिक-ए-तालिबान पाकिस्तान (TTP) या संघटनेची कमांड असल्याचे मानले जाते. त्यामुळेच हल्ल्यानंतर लगेचच पाकिस्तानी लष्कराने अफगाणिस्तानच्या तालिबान सरकारवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला. आपल्या देशातील बहुतांश हल्ले टीटीपी करतात आणि हल्ल्यानंतर दहशतवादी अफगाणिस्तानात पळून जातात, असा आरोप पाकिस्तान दीर्घकाळापासून करत आहे. तेथील तालिबान सरकार त्यांना आश्रय देते.

तालिबानने पुरावे मागितले

अफगाणिस्तानच्या तालिबान सरकारचे प्रवक्ते जबिउल्लाह मुजाहिद म्हणाले – जर पाकिस्तान सरकारला या प्रकरणाची चौकशी करायची असेल, तर सर्वप्रथम त्यांनी पुरावे द्यावेत. कोणत्याही पुराव्याशिवाय या प्रकरणाचा तपास कसा करता येईल.

तहरीक-ए-जिहाद पाकिस्तानने (टीजेपी) हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. अलीकडच्या काळात पाकिस्तानमध्ये झालेल्या काही मोठ्या हल्ल्यांमध्ये या संघटनेचे नाव पुढे आले आहे. पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्टपणे म्हटले आहे की TJP ही तालिबान पाकिस्तानची एक शाखा आहे आणि ती बदललेल्या नावाने कार्यरत आहे.

याआधी 4 नोव्हेंबरला पाकिस्तानच्या मियांवली एअरबेसवर हल्ला झाला होता. सशस्त्र आत्मघाती हल्लेखोर हवाई दलाच्या प्रशिक्षण तळात घुसले होते. दहशतवादी पायऱ्यांवरून भिंत चढून एअरबेसमध्ये घुसले होते.

Afghanistan suspected of attack on Pak military base

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात