मध्य प्रदेशात “मोहन यादवी” कायदेशीर दंडा सुरू; मशिदींवरच्या लाऊड स्पीकरला चाप; खुल्यावर मांस विक्रीलाही बंदी!!

विशेष प्रतिनिधी

भोपाळ : मध्य प्रदेशात मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्याबरोबर लगेच डॉ. मोहन यादव यांनी यादवी कायदेशीर दंडा चालवला आहे. मशिदींवरच्या लाऊड स्पीकरला चाप लावतच त्यांनी खुल्यावर मांस विक्रीलाही बंदी घातली आहे. madhya pradesh mohan yadav new chief minister stop mosque loudspeaker

मुख्यमंत्रीपदाची शपथ घेऊन मोहन यादव यांनी आज मुख्यमंत्री कार्यालयात येऊन राज्याची सूत्रे हाती घेतली आणि त्यांनी पहिला आदेश पारित केला, तो म्हणजे मध्य प्रदेशातील धार्मिक स्थळांवरील अर्थातच मशिदींवरील लाऊड स्पीकरच्या अनिर्बंध वापरावर चाप लावण्याचा आणि खुल्यावर मांस विक्रीलाही बंदी घालण्याचा आहे.

उत्तर प्रदेशात योगी आदित्यनाथ यांच्या राजवटीत अयोध्या काशी आणि मथुरा या तीर्थक्षेत्रांमध्ये खुल्या मांस विक्रीवर बंदी आहेच, तशीच बंदी मुख्यमंत्री मोहन यादव यांनी आज मध्य प्रदेशात लागू केली आहे.



राज्यातल्या पोलीस महासंचालकांना राज्याच्या गृह विभागाने हे आदेश पाठविले आहेत. यात सुप्रीम कोर्टाच्या निर्देशांच्या कठोर अंमलबजावणीची निर्देशही दिले आहेत.

मोहन यादव यांची मुख्यमंत्री पदावर निवड झाल्याबरोबर त्यांचा एक जुना व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला त्यामध्ये त्यांनी मध्य प्रदेशात नमाज पठणावर किंवा धार्मिक शिक्षणावर बंदी नाही पण रस्त्यांवर नमाज पठण नको आणि हा हिंदुस्थान आहे हे तुम्ही विद्यार्थ्यांना शिकवा असे परखड बोल मुल्ला मौलवींना ऐकवल्याचे त्या व्हिडिओ मधून दिसत होते.

शिवराज सिंह चौहान यांच्या मंत्रिमंडळात मोहन यादव उच्च शिक्षण मंत्री होते. त्यामुळेच त्यांनी धार्मिक शिक्षणाच्या बरोबरच हा हिंदुस्थान देश आहे हे तुम्ही शिकवा असे मदरसे चालवणाऱ्या मुल्ला मौलवींना सुनावले होते. आज मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्याबरोबर त्यांनी आपल्या जुन्या वर्तणुकीनुसार प्रत्यक्ष निर्णय घेऊन मशिदींवरच्या लाऊड स्पीकरला चाप लावला, तसेच खुल्या मांस विक्रीवरही बंदी घातली.

madhya pradesh mohan yadav new chief minister stop mosque loudspeaker

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात