यावर्षी आतापर्यंत 28 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली आहे
विशेष प्रतिनिधी
कोटा : कोटा येथील कोचिंग विद्यार्थ्याच्या आत्महत्येचे प्रकरण पुन्हा एकदा समोर आले आहे. कोटा येथे NEET ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याने आत्महत्या केली आहे. फरिद हुसेन हा पश्चिम बंगालचा रहिवासी होता. Suicide of a student preparing for NEET in Kota
शहरातील वक्फ नगर परिसरात भाड्याच्या खोलीत राहणाऱ्या फरिद हुसेन याने सायंकाळी उशीरा आपल्या खोलीत गळफास लावून घेतला. हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्याला खासगी रुग्णालयात नेण्यात आले. तेथे डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. मृतदेह एमबीएस रुग्णालयाच्या शवागारात हलवण्यात आला आहे.
दादाबारी पोलीस स्टेशनचे सीआय राजेश पाठक यांनी सांगितले की, फरिद भाड्याच्या घरात राहत असताना खासगी कोचिंगसह NEET ची तयारी करत होता. घरात इतर मुलेही राहतात. दुपारी ४ वाजेपर्यंत मुलांनी त्याला पाहिले होते. मात्र त्यानंतर सायंकाळी ७ वाजेपर्यंत तो खोलीतून बाहेर आला नव्हता. त्याच्या मित्रांनी हाक मारली असता फरिदने गेट उघडले नाही. त्यांनी घरमालकाला माहिती दिली.
घरमालकाच्या माहितीवरून पोलीस घटनास्थळी पोहोचले. फरिदने संध्याकाळी 5 ते 7 च्या दरम्यान गळफास लावून घेतला. सध्या आत्महत्येचे कारण समोर आलेले नाही. याची माहिती कुटुंबीयांना देण्यात आली आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App