शेतकरी संघटना आणि कारखानदारांची तिसरी बैठकही निष्फळ
विशेष प्रतिनिधी
कोल्हापूर : ऊस दर वाढीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आता १९ नोव्हेंबर रोजी चक्काजाम आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी ही घोषणा केली आहे. Swabhimani Shetkari Saghtana will do chakkajam protest for sugarcane price
कोल्हापूरात आज या संदर्भात पार पडलेली शेतकरी संघटना आणि कारखानदारांची तिसरी बैठकही निष्फळ ठरली. अखेरपर्यंत काहीच तोडगा निघाला नाही. बैठकीच्या सुरुवातीसच गोंधळ पाहायला मिळाला, मात्र नंतर बैठक सुरू झाली परंतु तोडगा काढण्यात यश आले नाही.
पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी मागील हंगामातील ४०० रुपयांसाठी कमिटी नेमण्याचा प्रस्ताव दिला होता. स्वाभिमानी शेतकरी संघटनेने तो धुडकावला आहे. अखेर आता ऊस दराचे आंदोलन पुन्हा चिघळणार असल्याचे दिसते.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App