विशेष प्रतिनिधी
मुंबई : तथाकथित धर्मनिरपेक्षतेचे भूत डोक्यावर चढलेल्या बड्या ब्रँड नी देशात बिझनेस जिहादचाही प्रयत्न केला होता पण बिझनेस मध्ये फटका खाल्ल्यावर ते सरळ झाले. याचे प्रत्यंतर 2023 च्या दिवाळीत आले. जश्न-ए-दिवाली, जश्न-ए-रिवाज वगैरे फालतुगिरीला यंदाच्या दिवाळीत फटका बसला. कारण जागृत हिंदूंनी तसले फालतू जश्न हाणून पाडले. त्यामुळे जाहिरातींमध्ये देखील नो बिंदी नो बिझनेसचा परिणाम दिसला आणि हाँ बिंदी भरघोस बिझनेसचा परिणाम झाला. no bindi no business
गेल्या वर्षी सोन्याचे दागिने विकणाऱ्या मोठ्या कंपन्यांनी दिवाळीच्या वेळी जाहिराती केल्या होत्या, मात्र त्यामध्ये कुंक न लावलेल्या Model दाखवल्या होत्या, ज्यामुळे सोशल मीडियामध्ये संतापाची लाट उसळली होती. त्यातून धडा घेऊन यंदाच्या दिवाळीत या कंपन्यांनी या सुधारणा करून कुंकू लावलेले model दिसल्या.
मागच्या वर्षी हिंदूंच्या सणानिमित्त दागिन्यांच्या जाहिराती दाखवताना त्यात हिंदु संस्कृतीप्रमाणे कुंकू न लावलेले Model दाखवण्यात आले होते. यामध्ये तनिष्क, मलबार गोल्ड, पु. ना. गाडगीळ. पी. सी. चंद्रा आदी दागिने व्यापार्यांचा समावेश होता.
आर्थिक फटका बसल्याच्या भीतीने सुतासारखे सरळ
मागील वर्षीपर्यंत या दागिने व्यापार्यांनी हिंदूंच्या सणांनिमित्त जाहिराती करताना वरील हिंदू धर्मविरोधी कृत्य केले होते. त्यावर प्रसिद्ध हिंदुत्वनिष्ठ लेखिका शेफाली वैद्य यांनी सामाजिक माध्यमांवरून ‘#NoBindiNoBusiness’ असे आवाहन केले होते, म्हणजेच ज्या कंपन्या त्यांच्या जाहिरातीतील महिलांच्या कपाळावर टिकली/कुंकू दाखवणार नाहीत, त्यांच्यावर आर्थिक बहिष्कार घातला पाहिजे.
‘मलबार गोल्ड अँड डायमंड ज्वेलर्स’ने वर्ष 2022 च्या अक्षय्य तृतीयेच्या निमित्ताने केलेल्या जाहिरातीत महिलांच्या कपाळावर कुंकू दाखवले नव्हते. या विरोधात हिंदू जनजागृती समितीच्या वतीनेही ‘#NoBindi_NoBusiness’ आणि ‘#Boycott_MalabarGold’ असे आवाहन करण्यात आले होते. त्यानंतर ‘मलबार गोल्ड अँड डायमंड ज्वेलर्स’ने जाहिरात मागे घेतली होती. हिंदूंनी वेळीच केलेल्या विरोध केल्यामुळे आर्थिक फटका बसल्याच्या भीतीने या वर्षीच्या दिवाळीच्या अनेक जाहिरातीत महिलांना दागिने, तसेच कपाळावर कुंकू यांच्यासह दाखवण्यात आले आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App