खलिस्तानी दहशतवादी निज्जर विषयी कॅनडियन पंतप्रधान पुन्हा “कळवळले”; भारताकडून राजनैतिक फटके खाऊनही जस्टिन ट्रुडो बरळले!!

वृत्तसंस्था

टोरांटो : खलिस्तानी दहशतवादी हरदीप निज्जर याच्या हत्येच्या मुद्द्यावर भारताकडून राजनैतिक फटके खाऊनही कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांचे भारताविरुद्ध बरळणे सुरूच आहे. भारतात आणि भारताबाहेरील भारतीयामध्ये दिवाळीचा उत्साह असताना त्यावर पाणी फेरण्याचे काम जस्टिन ट्रुडो यांनी केले आहे.Canadian PM “concerned” again about Khalistani terrorist Nijjar; Justin Trudeau bounces back despite receiving a diplomatic blow from India!!

खलिस्तान समर्थक हरदीप सिंग निज्जरच्या हत्या प्रकरणामुळे भारत आणि कॅनडामधील संबंध ताणले गेले. या हत्येवरून कॅनडाने भारतावर वेगवेगळे आरोप केल्यानंतर उभय देशांमधील संबंध बिघडण्यास सुरुवात झाली. निज्जरच्या हत्येत भारताचा सहभाग असल्याचा आरोप करत कॅनडा सरकारने तिथल्या भारतीय उच्चायुक्तांची हकालपट्टी केली. त्यापाठोपाठ भारतानेही स्पष्ट शब्दांत कॅनडा सरकारला ठणकावले आणि भारतातल्या कॅनडाच्या उच्चायुक्तांची हकालपट्टी केली. इतकेच नाही तर कॅनडाच्या 55 अधिकार्‍यांना त्यांच्या देशात परत पाठवून दिले. या भारताचे नव्हे, तर कॅनडाचे नुकसान झाले.



पण तरीही कॅनडियन पंतप्रधान सुधारण्याचे नाव घेत नाहीत. जस्टिन ट्रुडो म्हणाले, अत्यंत गंभीर विषयांवर आम्हाला भारताबरोबर काम करायचं आहे आणि आम्ही ते त्यांना स्पष्टपणे सांगितलं आहे. अगदी सुरुवातीपासूनच आम्ही पुराव्यांच्या आधारे खरे आरोप केले. कारण, याप्रकरणी आम्ही खूप गंभीर आहोत. म्हणूनच आम्ही या गोष्टी भारतासह जगभरातील आमच्या भागीदारांबरोबर शेअर केल्या. त्यानंतर भारताने व्हिएन्ना कराराचं उल्लंघन केलं, त्यापाठोपाठ त्यांनी भारतातल्या कॅनडाच्या उच्चायुक्तांची हकालपट्टी केली. त्याचं आम्हाला खूप वाईट वाटलं.

ट्रुडो म्हणाले, भारत सरकारचे एजंट हे एका हत्येत गुंतले असावेत, आमच्याकडे यासंबंधीचे पुरावे आहेत. कॅनडाच्या भूमीवर कॅनेडियन नागरिकाची हत्या करणे म्हणजे व्हिएन्ना कन्व्हेन्शनच्या नियमांचे उल्लंघन आहे. तसेच कॅनेडियन अधिकाऱ्यांची हकालपट्टी करणं हेदेखील नियमाचं उल्लंघन आहे, असा दावा जस्टिन यांनी केला. भारताने राजनैतिक पातळीवर फटके देऊ नये आपण सुधारलो नसल्याचेच त्यांनी भारतविरोधी राजकीय वक्तव्यातून दाखवून दिले.

Canadian PM “concerned” again about Khalistani terrorist Nijjar; Justin Trudeau bounces back despite receiving a diplomatic blow from India!!

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात