विशेष प्रतिनिधी
मुंबई : महाराष्ट्राच्या राजकीय आखाड्यात शरद पवारांचे राजकीय कर्तृत्व खूप उत्तुंग आहे, असा नॅरेटिव्ह खुद्द त्यांनी आणि त्यांच्या समर्थकांनी काही दशके महाराष्ट्रात रुजवला होता, पण आता पवारांच्या उत्तुंग राजकीय कर्तृत्वावरचा त्यांनीच सेट केलेला नॅरेटिव्ह आता जातीवर आला आणि पवार हे मराठा की ओबीसी??, असा वाद रंगत चालला. Is Pawar Maratha or OBC??, the debate raged
मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शरद पवार हे मराठा आरक्षणाचे खरे मारेकरी आहेत, असा आरोप करून लेखक नामदेवराव जाधव यांनी शरद पवार मूळात मराठाच नाहीत, तर ते ओबीसी आहेत. कारण त्यांच्या निवडणूक आयोगातल्या कागदपत्रांवर त्यांनी मराठा ही जातच लिहिलेली नाही, तर हिंदू ओबीसी अशी जात लिहिली आहे, असा दावा केला. त्यासाठी त्यांनी निवडणूक आयोगाच्या वेबसाईटचा हवाला दिला. त्यामुळे शरद पवार हे मूळात मराठाच नसल्याने त्यांनी महाराष्ट्रात मराठा आरक्षण कधीच अंमलात येऊ दिले नाही. उलट त्यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात म्हणजे 1994 मध्ये त्यांनी जीआर मध्ये खाडाखोड करून मराठा जातीला आरक्षण मिळू दिले नाही, असा आरोपही पवारांच्या विरोधकांनी केला. त्याचे व्हिडिओ वेगवेगळे लेख माध्यमांमध्ये आणि सोशल मीडियावर व्हायरल झाले.
त्यामुळे पवारांची नेमकी जात कोणती?? ते मराठा की ओबीसी??, हा वाद महाराष्ट्राच्या आखाड्यात चांगलाच रंगला.
पवार समर्थकांचा दावा
पवारांचे समर्थक विकास पासलकर यांनी शरद पवारांचे स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट सोशल मीडियावर व्हायरल केले. त्यावर शरद पवारांची जात मराठा असल्याचे नमूद आहे. हे स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट ओरिजिनल असल्याचाही त्यांचा दावा आहे. त्यामुळे एकीकडे पवारांचे विरोधक पवार मराठाच नव्हेत तर ओबीसी आहेत, असा दावा करत असताना त्यांचे समर्थक मात्र पवार मराठाच आहेत असा दावा ठामपणे करत आहेत.
याचा अर्थ असा की आत्तापर्यंत शरद पवारांचे राजकीय कर्तृत्व किती उत्तुंग आहे, त्यांचा केंद्रीय राजकारणावर कसा प्रभाव आहे, त्यांनी आपल्या राजकीय कर्तृत्वाच्या बळावर महाराष्ट्रात कसे सत्ता परिवर्तन घडवून आणले वगैरे नॅरेटिव्ह त्यांचे समर्थक आणि मराठी माध्यमिक चालवत होती. पण आता हा पवारांच्या राजकीय कर्तृत्वाचा नॅरेटिव्ह बाजूला पडून पवारांची नेमकी जात कोणती??, ते मराठा की ओबीसी??, असा वाद महाराष्ट्राच्या राजकीय आखाड्यात रंगला आहे… तो देखील पवारांची सगळी कारकीर्द अखेरच्या टप्प्यात येऊन पोहोचली असताना!!, हे पवारांच्या राजकारणाचे वैशिष्ट्यपूर्ण लक्षण ठरते आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App