नवी दिल्ली विषारी धुक्याच्या जाड थराने लपेटली असून हवेची गुणवत्ता “गंभीर श्रेणीत” कायम आहे.
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : राजधानी दिल्लीतील वायू प्रदूषणाने धोकादायक पातळी गाठली आहे. दिल्ली-एनसीआरमध्ये अनेक ठिकाणी एअर क्वालिटी इंडेक्स (AQI) 450 च्या पुढे गेला आहे. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या (CPCB) आकडेवारीनुसार, आज म्हणजेच 5 नोव्हेंबर रोजी राजधानी दिल्लीत पहाटे 4.18 वाजता AQI 453 नोंदवण्यात आला, जो गंभीर श्रेणीत येतो. Delhi Mumbai and Kolkata included in the list of most polluted cities in the world
नवी दिल्ली विषारी धुक्याच्या जाड थराने लपेटली आहे. येथे, हवेची गुणवत्ता “गंभीर श्रेणीत” कायम आहे. स्विस समूह IQAir च्या आकडेवारीनुसार, राजधानी दिल्ली, कोलकाता आणि मुंबईसह आज जगातील सर्वात प्रदूषित शहरांपैकी एक आहे.
आज सकाळी 7.30 वाजता, नवी दिल्ली 483 च्या AQI सह रिअल-टाइम यादीमध्ये पुन्हा अव्वल स्थानावर आहे, त्यानंतर लाहोर 371 वर आहे. कोलकाता आणि मुंबई देखील अनुक्रमे 206 आणि 162 AQI सह वायू प्रदूषणाने सर्वाधिक प्रभावित झालेल्या 5 शहरांमध्ये आहेत.
ग्रेटर नोएडा आणि फरीदाबादही प्रमुख 10 प्रदूषित शहरांमध्ये –
CPCB च्या मते, टॉप-10 प्रदूषित शहारांमध्ये एनसीआरच्या ग्रेटर नोएडामध्ये 476 आणि फरिदाबादमध्ये 456 एक्यूआय पातळी नोंदवली गेली आहे. त्याचवेळी नोएडामध्ये AQI पातळी 433, हरियाणाच्या गुरुग्राममध्ये 435, सिरसामध्ये 432, कैथलमध्ये 455, फतेहाबादमध्ये 454 आणि हिसारमध्ये 447 वर पोहोचली आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App