वृत्तसंस्था
नवी दिल्ली : तब्बल 338 कोटी रुपयांचा मनी ट्रेल सापडल्याच्या दारू घोटाळ्यात अटक टाळण्यासाठी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आज आयत्यावेळी कायदेशीर पळवाट काढली. ईडीच्या नोटिशीला लेखी प्रत्युत्तर देऊन ते मध्य प्रदेशात प्रचारासाठी रवाना झाले. Kejriwal’s legal loophole to avoid arrest
दारू घोटाळ्यात चौकशी आणि तपासासाठी सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडी कार्यालयात उपस्थित राहण्यासाठी ईडीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी अरविंद केजरीवालांना नोटीस पाठवली होती. आज 2 नोव्हेंबर 2023 त्यांच्या हजेरीची तारीख होती. ही नोटीस त्यांना 30 ऑक्टोबरला पाठवण्यात आली होती. पण अरविंद केजरीवाल यांनी राजकीय चतुराई दाखवत त्यादिवशी किंवा 31 ऑक्टोबर आणि 1 नोव्हेंबर या दोन दिवसांमध्ये प्रत्युत्तर न देता त्यांनी प्रत्यक्ष हजर राहण्याच्या दिवशी सकाळी म्हणजे 2 नोव्हेंबर 2023 रोजी ईडीला लेखी उत्तर पाठविले.
ईडीच्या नोटिशीत त्रुटी असल्याचा दावा केला. ईडीने आपणास व्यक्तिगत अथवा दिल्लीचा मुख्यमंत्री म्हणून किंवा आम आदमी पार्टीचा संयोजक म्हणून नेमकी कोणत्या भूमिकेत चौकशी आणि तपास करण्यासाठी नोटीस पाठवली आहे??, अशी विचारणा अरविंद केजरीवाल यांनी केली. त्याचबरोबर आम आदमी पार्टीचा संयोजक म्हणून दिल्लीचा मुख्यमंत्री म्हणून कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी आपल्याला बाहेर जावे लागत असल्याचे त्यांनी उत्तरात नमूद केले आहे.
त्यापलीकडे जाऊन ईडीने ही नोटीस लीक करून भाजप कार्यकर्त्यांना आणि नेत्यांना पाठवली. त्यामुळे भाजप कार्यकर्त्यांच्या त्यावर लगेच प्रतिक्रिया येऊन मला अटक होणार असा दावा त्यांनी केला, असा आरोप केजरीवाल यांनी ईडीला दिलेल्या लेखी उत्तरात केला आहे.
पण सर्वांत महत्त्वाचा मुद्दा म्हणजे अरविंद केजरीवाल यांनी ईडीच्या नोटिशीला प्रत्यक्ष हजर राहण्याच्या दिवशी म्हणजे 2 नोव्हेंबर 2023 रोजी लेखी उत्तर पाठवून अटक टाळण्यासाठी कायदेशीर पळवाट काढली आणि ते मध्य प्रदेशात प्रचारासाठी रवाना झाले हा आहे.
आता यापुढे अरविंद केजरीवाल यांच्या उत्तरावर ईडी नेमकी काय कार्यवाही करणार?? 338 कोटी रुपयांचा मनी ट्रेल सापडल्याचा दारू घोटाळ्यातल्या तपास कोणत्या दिशेने पुढे नेणार?? अरविंद केजरीवाल यांची प्रत्यक्ष चौकशी आणि तपास कधी करणार??, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App