सीमेवर वेगवेगळ्या सेक्टरमध्ये तीन S-400 क्षेपणास्त्रे आधीच तैनात आहेत.
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : भारतीय हवाई दलाने पाकिस्तान आणि चीन सीमेवर S-400 क्षेपणास्त्र सक्रीय केले आहे. लष्करी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सीमेवर वेगवेगळ्या सेक्टरमध्ये तीन S-400 क्षेपणास्त्रे आधीच तैनात आहेत. यातील एक क्षेपणास्त्र पाकिस्तान सीमेवर आणि दुसरे चीन सीमेवर आणि तिसरे क्षेपणास्त्र पाकिस्तान आणि चीन सीमेवर तैनात करण्यात आले आहे. India deploys S 400 missile flying at a speed of 7 km per second on the border
तर दोन स्क्वॉड्रनच्या वितरणासाठी भारत लवकरच रशियासोबत बैठक घेणार आहे. भारताने 2018-19 मध्ये 35 हजार कोटी रुपये खर्चून 5 S-400 क्षेपणास्त्रे खरेदी करण्याचा करार केला होता. यापैकी भारताला तीन क्षेपणास्त्रे मिळाली आहेत. रशिया-युक्रेन युद्धामुळे दोन क्षेपणास्त्रे मिळण्यास विलंब झाला असला, तरी उर्वरित दोन क्षेपणास्त्रे भारताला कधी देणार हे रशियाने अद्याप स्पष्ट केलेले नाही.
तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, भारतीय हवाई दलासाठी बनवलेल्या S-400 क्षेपणास्त्रांचा वापर रशियाने युक्रेन युद्धात केला आहे.दोन क्षेपणास्त्रे लवकरात लवकर मिळावीत यासाठी भारत सर्वतोपरी प्रयत्न करत आहे, जे सुरक्षाकडे मजबूत करण्यासाठी सीमेवर तैनात केले जाऊ शकतात.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App