आमच्याकडे देशातील सर्वोत्तम शूटर्स आहेत, पैसे न दिल्यास ठार मारू असं म्हटलेलं आहे.
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली: रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांना आज म्हणजेच ३१ ऑक्टोबर रोजी एका अज्ञात व्यक्तीकडून धमकीचा ईमेल आला आहे, ज्यामध्ये ४०० कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी करण्यात आली आहे. पोलिसांनी मंगळवारी ही माहिती दिली. एका अधिकाऱ्याने सांगितले की, चार दिवसांत अंबानींना पाठवलेला हा तिसरा धमकीचा ईमेल आहे. Death threat to Mukesh Ambani for the third time in four days
आधीच्या ईमेलला कोणताही प्रतिसाद न दिला गेल्याने, धमकी पाठवणाऱ्याने आता मुकेश अंबानींकडे ४०० कोटी रुपयांची मागणी केली आहे. माहितीनुसार, यापूर्वी शनिवारी देखील आणखी एक धमकीचा ईमेल आला होता, ज्यामध्ये २०० कोटी रुपयांची मागणी करण्यात आली होती. आता, खंडणीची रक्कम दुप्पट करून ईमेल पाठवला आहे.
त्याच वेळी, शुक्रवारी, २७ ऑक्टोबर रोजी मुकेश अंबानी यांना अज्ञात व्यक्तीकडून जीवे मारण्याची धमकी आणि २० कोटी रुपयांची मागणी असलेला पहिला ईमेल आला. यानंतर उद्योगपतीच्या सुरक्षा प्रभारींनी गावदेवी पोलिस ठाण्यात एफआयआर दाखल केला. हा ईमेल शादाब खानच्या नावाने एका यूजरने पाठवला आहे. 20 कोटी रुपये न दिल्यास आम्ही तुला मारून टाकू, आमच्याकडे देशातील सर्वोत्तम शूटर आहेत असे धमकीच्या या ईमेलमध्ये लिहिले होते.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App