शासन आपल्या दारी : यवतमाळ जिल्ह्यात 16 लाख लाभार्थ्यांना 601 कोटी रुपयांच्या योजनांच्या लाभांचे वितरण!!

प्रतिनिधी

यवतमाळ : महाराष्ट्रात मराठा आरक्षण विरोधक हिंसक झाल्याच्या पार्श्वभूमीवर यवतमाळ जिल्ह्यात शासन आपल्या दारी कार्यक्रमाआधी मराठा आंदोलकांनी शासकीय पोस्टरला काळे फासले होते, पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा शासन आपल्या दारी हा कार्यक्रम यवतमाळ मध्ये पार पडला. या कार्यक्रमात यवतमाळ जिल्ह्यातील 16 लाख लाभार्थ्यांना 601 कोटी रुपयांच्या विविध योजनांचे लाभ वितरित करण्यात आले. shashan aaplya dari in yavatmal

यवतमाळ जिल्ह्याला आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचा जिल्हा ही ओळख पुसून काढण्यासाठी शासन प्रयत्नशील असून या भागातील शेतकरी अडचणीत असून त्याला कोणत्याही परिस्थितीत वाऱ्यावर सोडणार नाही अशी ग्वाही यावेळी दिली. शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी 1 रुपयात पीक विमा दिला, नुकसान भरपाईची रक्कम दुप्पट केली, पीएम किसान योजनेद्वारे 6000 रुपयांची मदत दिली जात असताना नमो सन्मान योजनेतून त्यात अजून 6000 रुपयांची भर घातली असल्याचे स्पष्ट केले.

यवतमाळ जिल्ह्यातील 881 कोटी रुपये खर्चाच्या 5 विकास कामांचे लोकार्पण आणि 32 विकास कामांचे भूमिपूजन यावेळी करण्यात आले. तसेच वन्य प्राण्यांपासून होणारे नुकसान टाळण्यासाठी यवतमाळ जिल्ह्यात 21000 शेतकऱ्यांच्या सोलर झटका मशीन देण्याचे जाहीर केले. जलयुक्त शिवार 2 योजना नव्याने सुरू केली. तसेच समृद्धी महामार्ग यवतमाळला जोडण्यात येईल असेही यावेळी जाहीर केले.

यवतमाळ जिल्ह्यातील 75 शाळा मॉडेल शाळा करण्यात येतील. शाळांमधील शिक्षकांची रिक्त पदे भरण्यासाठी मानधन तत्वावर शिक्षक भरले जातील त्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी प्रस्ताव पाठवावा असे सूचित केले.
जिल्ह्यात विटारा कंपनी 5000 कोटींची गुंतवणूक करणार आहे त्यामुळे भविष्यात येथील तरुणांना जिल्ह्यातच रोजगार मिळू शकेल असेही यावेळी सांगितले.

मराठा समाजाला टिकणारे आरक्षण देण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. त्यासाठी काम सुरु झाले आहे. समाजाने संयम बाळगणे आवश्यक आहे. टोकाचे पाऊल कुणीही उचलू नये. समाज बांधवांचा जीव महत्त्वाचा आहे. संविधानिक मार्गाने टिकणारे आरक्षण मिळावे यासाठी अधिक वेळ लागेल त्यामुळे थोडा वेळ दिल्यास यावर नक्की मार्ग निघेल असेही यावेळी बोलताना स्पष्ट केले.

याप्रसंगी राज्याचे मृद आणि जलसंधारण मंत्री आणि यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड, खासदार भावना गवळी, आमदार भरतशेठ गोगावले, आमदार डॉ.अशोक उईके, आमदार संजिवरेड्डी बोदकुरवार, आमदार डॉ. संदीप धुर्वे, आमदार इंद्रनील नाईक, आमदार किरण सरनाईक तसेच इतर सर्व लोकप्रतिनिधी आणि जिल्ह्याचा कानाकोपऱ्यातून आलेले लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

shashan aaplya dari in yavatmal

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात