विशेष प्रतिनिधी
बंगळुरू : वीरभद्र नगरजवळील एका गॅरेजला भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. त्यामुळे इथे उभा असलेल्या अनेक बसेस जळून खाक झाल्या आहेत. सध्या अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी पोहोचले असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. A huge fire broke out in Bangalores Veerbhadra Nagar and many buses were gutted
वीरभद्र नगरजवळील गॅरेजमधून आग लागल्याचा संशय आहे. या घटनेचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. यासोबतच अद्याप कोणतीही जीवितहानी किंवा जखमी झाल्याचे वृत्त नाही.
अग्निशमन विभागाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, “बस गॅरेजमध्ये उभ्या होत्या. आमचे अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी आहेत आणि आग विझवण्याचा प्रयत्न करत आहेत. आगीचे कारण अद्याप समजलेले नाही.”
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App