महाराष्ट्रात जात नाही तर कर्तृत्त्व, चारित्र्य आणि आचार-विचारालाच महत्व, हे विसरता येणार नाही – रोहित पवार

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहत पवारांचं देवेंद्र फडणवीसांना उद्देशून विधान


विशेष प्रतिनिधी

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी उपमुख्यमंत्री रोहित पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. रोहित पवारांनी ट्वीटरवर एख पोस्ट लिहून टिप्पणी केली आहे. रोहित दोनच दिवसांपूर्वी युवा संघर्ष यात्रा स्थगित करण्याचा निर्णय़ घेतलेला आहे.In Maharashtra not caste but achievement character and ethics are important Rohit Pawar

रोहित पवार म्हणतात, ”महाराष्ट्रात प्रत्येकाला आपली जात आणि धर्माविषयी अभिमान आहे पण म्हणून कुणी त्याचं राजकीय भांडवल करत नाही तर ते व्यक्तिगत जपलं जातं.. पुरोगामी महाराष्ट्राने जातीवादाला कधी थारा दिला नाही. वेगवेगळ्या नेत्यांवर प्रेम करताना जातीचा कधीही विचार केला नाही.”



याशिवाय, ”आज नितीन गडकरी साहेब यांच्यावरही महाराष्ट्र प्रेम करतो.. हे सगळं प्रेम जातीमुळे मिळत नाही तर त्यांनी स्वकर्तृत्वातून आणि नैतिक आचार-विचारातून कमावलंय.. असं असताना एखादी गोष्ट अंगलट आल्यानंतर त्यातून सावरण्यासाठी जातीचं कार्ड बाहेर काढणं हे फडणवीस साहेब आपण ज्या पदावर आहात त्या पदावरील नेत्याकडून अपेक्षित नाही.”

”महाराष्ट्रात जात नाही तर कर्तृत्त्व, चारित्र्य आणि आचार-विचार यालाच महत्व आहे, हे विसरता येणार नाही. महाराष्ट्रात राजकारणासाठी सततच जात-धर्मावर बोलल्याने राज्यातले सामान्य माणसाचे प्रश्न सुटणार नाहीत. युवांना रोजगार मिळत नसल्याने लोकांच्या अडचणी वाढत आहेत. त्यामुळं फडणवीस साहेब आज जातीवर नाही तर नोकरी, गुंतवणूक, संधी यावर बोलण्याची गरज असल्याने हे सगळं थांबवा आणि मुद्द्याचं_बोला!” असं म्हणत रोहित पवारांनी देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधला आहे.

In Maharashtra not caste but achievement character and ethics are important Rohit Pawar

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात
    Icon News Hub