प्रतिनिधी
मुंबई : प्रधानमंत्री मातृवंदना योजनेच्या जनजागृती कार्यक्रमाचे आज आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमांमध्ये आठ लाखांहून अधिक मातांना तब्बल 321 कोटी रुपयांचे ऑनलाईन वाटप करण्यात आले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते हा कार्यक्रम झाला. pm matru vandana yojna in maharashtra online distribution
केंद्रीय महिला व बालविकास मंत्री श्रीमती स्मृती इराणी, केंद्रीय राज्यमंत्री डॉ. मुंजपरा महेंद्रभाई, कौशल्य,रोजगार,उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा, महिला व बालविकास मंत्री कु. आदिती तटकरे, आमदार आशिष शेलार यांचेसह देशभरातील महिला व बाल विकास विभागाचे अधिकारी, अंगणवाडी सेविका, आशा कर्मचारी उपस्थित होते.
राज्यातील प्रधानमंत्री मातृवंदना योजनेतील 8 लाख 14 हजार मातांना 321 कोटी 57 लाख रूपयांचे ऑनलाईन वाटप या कार्यक्रमात करण्यात आले आणि प्रधानमंत्री मातृवंदना योजनेची माहिती पुस्तिका, नवीन वेब पोर्टल आणि मोबाईल ॲपचा मान्यवरांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला.
महिलांच्या सक्षमीकरणासाठी केंद्र सरकारच्या सहकार्याने राज्य शासन विविध योजनांच्या माध्यमातून प्रयत्नशील असून राज्यातील तीन हजार अंगणवाडी मदतनीसांना अंगणवाडी सेविका पदावर लवकरच पदोन्नती देण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी केली.
नवरात्र संपल्यानंतर मातेला वंदन करण्याचा हा कार्यक्रम आहे. महिला या मातृशक्ती असून समाज, नवीन पिढी घडविण्याचे काम करीत असल्याने ती आदिशक्तीही आहे. केंद्र सरकारच्या मदतीने महिलांच्या समस्या सोडविण्यासाठी राज्य सरकार तत्पर आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी संसदेमध्ये महिलांना आरक्षण देवून त्यांचा सन्मान केला आहे. ग्रामीण भागात लाखो महिलांच्या नावाने घरे करण्यासाठी पीएम आवास योजनेतील घरांवर महिलांची नावे आली आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी इतिहासात पहिल्यांदाच पोषण ट्रॅकर सुरु करून करोडो माता – मुलांना योग्य रीतीने पोषणाची सेवा मिळते किंवा नाही याची तपासणी सुरु केली असल्याचे मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले.
गेल्या दीड वर्षात राज्य शासनानेही महिलांच्या कल्याणासाठी, त्यांना सक्षम करण्यासाठी ठोस पावले उचलली आहेत. राज्यात मुलींच्या सक्षमीकरणासाठी ‘लेक लाडकी’ ही योजना राबवित असून 1 एप्रिल 2023 नंतर गरीब कुटुंबात जन्मलेल्या मुलींना लखपती करणार आहे. प्रधानमंत्री यांच्या 73 व्या वाढदिवसानिमित्त राज्यात ‘नमो 11 कलमी कार्यक्रम’ राबवून महिला सशक्तीकरण अभियानातून 73 लाख महिलांना शासकीय योजनांचा लाभ देण्यात येणार असल्याचेही मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले.
राज्यातील महिलांना एसटी प्रवासात सरसकट 50 % सूट, नोकरदार महिलांसाठी 50 वसतिगृहे, महिलांचे आरोग्य चांगले राहावे म्हणून ‘माता सुरक्षित तर घर सुरक्षित’सारख्या योजनेत 1 कोटी 40 लाख महिलांची मोफत आरोग्य तपासणी केली. प्रधानमंत्री मातृ वंदना योजना सुरु झाल्यापासून आतापर्यंत 30 लाख 40 हजार उद्दिष्ट्य असताना सुमारे 35 लाख महिलांना लाभ देण्यात आले आहेत. प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेचे नवीन पोर्टल, मोबाईल ॲप, ऑनलाईन बेनिफिटचा शुभारंभ सुरू केला. दोन कोटी महिलांना बचत गटाच्या माध्यमातून सक्षम करणार असून बचत गटांना सक्षम करण्यासाठी पदार्थांच्या विक्रीसाठी योजना सुरू केली आहे.
केंद्र सरकारप्रमाणे शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेतून वर्षाला 6000 रुपये दिले जात आहेत. केंद्र व राज्य शासनाच्या सर्व योजनांच्या माध्यमातून सर्वसामान्यांचे बळकटीकरण करण्याचे काम केले जात आहे. महिला व बालविकास विभागाच्या अडचणी, प्रश्न सोडविण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याची ग्वाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App