धोरण आखले आहे, तोरण बांधण्याचे; मराठा आरक्षणावर शिंदे – फडणवीस सरकारची नवी जाहिरात!!

प्रतिनिधी

मुंबई : मराठा आरक्षणाच्या मुद्यावर मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा उपोषणाचे हत्यार उपसले असताना शिंदे – फडणवीसांच्या सरकारनामा सरकारने मराठा आरक्षणासंदर्भात नवी जाहिरात दिली आहे. धोरण आखले आहे, तोरण बांधण्याचे!!, अशी ही जाहिरात आहे. New advertisement of Shinde-Fadnavis government on Maratha reservation

मराठा आरक्षणासाठी जरांगेंनी दिलेल्या डेडलाईनला 24 तासच बाकी आहेत. 24 ऑक्टोबपर्यंत आरक्षणाचा निर्णय झाला नाही तर 25 तारखेपासून पुन्हा आमरण उपोषण सुरू करेन, असा इशारा मनोज जरांगेंनी दिला आहे. कायमस्वरूपी उपचार करण्याऐवजी मलमपट्टी करू नका आम्हाला आरक्षण द्या, दगाफटका करू नका असा इशाराही जरांगे पाटील यांनी दिला आहे.

आरक्षणाला वेळ लागू शकतो

तर मराठा आरक्षणासाठी वेळ लागू शकतो असे विधान मंत्री गिरीश महाजन यांनी केले आहे. टिकणारं मराठा आरक्षण मिळवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. तेव्हा हातघाईवर येऊ नका असा सबुरीचा सल्ला राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजनांनी जरांगे पाटील यांना दिलाय.. मराठा समाजाचे आंदोलन जरांगे पाटील यांनी सरकारला दिलेली मुदत ही पूर्ण होणार असून सरकार यावर सकारात्मक असून मराठ्यांना टिकेल असं आरक्षण देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचं गिरीश महाजन यांनी म्हटलंय.

जरांगे पाटील यांनी सांगितल्या प्रमाणे 40 दिवस होत आहे हे खरे आहे, या बाबत शासन अतिशय सकारात्मक आहे, या साठी शासन रात्रंदिवस काम करत आहे. मात्र अजून काहीसा वेळ लागू शकतो, हा विषय अतिशय घाईत करण्या सारखा नाही, हे जर कायद्याच्या चौकटीत टिकवायचा असेल तर नियमानेच ते करावा लागणार आहे, अन्यथा  पुन्हा न्यायालयात टिकले नाही असे व्हायला नको, त्यातून निराशा येऊ शकते असं स्पष्टीकरण जरांगेंनी दिले.

राज्य सरकारची मराठा आरक्षण जाहिरात

राज्य सरकारने मराठा आरक्षणावरुन पुन्हा एकदा जाहिरात प्रसिद्ध केली आहे. मराठा आरक्षणाचे वचन पूर्ण करण्याचे धोरण आखल्याची माहिती या जाहिरातीतून सरकारने दिली आहे. त्या जाहिरातीवर देखील राजकीय वर्तुळातून विविध प्रतिक्रिया आल्या आहेत.

New advertisement of Shinde-Fadnavis government on Maratha reservation

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात