“मनातले पंतप्रधान” आले पोस्टरवर; I.N.D.I आघाडीत गर्दी झाली एकाच खुर्चीवर!!

वृत्तसंस्था

लखनौ : मनातले पंतप्रधान आले पोस्टरवर आणि I.N.D.I आघाडीत गर्दी झाली एकाच खुर्चीवर!!, असे म्हणायचे वेळ आली आहे. मध्य प्रदेशात अखिलेश यादव यांच्या समाजवादी पार्टीला सहा जागा नाकारून काँग्रेसने ही राजकीय कम्बख्ती उडवून घेतली आहे. अखिलेश यादव यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या समर्थकांनी लखनऊमध्ये त्यांच्या नावाची “भावी पंतप्रधान” म्हणून पोस्टर्स झळकवली आहेत. यामुळे काँग्रेसमधल्या नेत्यांच्या महत्त्वाकांक्षांना सुरुंग लागला आहे.  akhilesh yadav next prime minister on poster

अखिलेश यादव यांचे समर्थक आणि समाजवादी पार्टीचे प्रवक्ते फखरूल हसन चांद यांनी समाजवादी पार्टीच्या मुख्यालयासमोर अखिलेश यादव यांचे “भावी पंतप्रधान” म्हणून पोस्टर लावले आहे. मध्य प्रदेशात काँग्रेसने समाजवादी पार्टीला झिडकारल्यामुळे अखिलेश यादव आणि समाजवादी पार्टीचे कार्यकर्ते चिडले आहेत म. त्यांनी उत्तर प्रदेशात कोणत्याही स्थितीत काँग्रेसला धडा शिकवायचेच ठरविले आहे आणि त्यातूनच अखिलेश यादव यांची “भावी पंतप्रधान” म्हणून पोस्टर्स झळकावली आहेत.

पण अखिलेश यादव यांचे मित्र आणि बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी मात्र या पोस्टर्स मधली हवा काढली आहे. पंतप्रधान होण्याची अनेकांची इच्छा असते, पण आमच्या दृष्टीने हा कोणता महत्त्वाचा मुद्दा नाही आम्हाला अनेक जण कृष्ण, अर्जुन वगैरे बनवून पोस्टर्स वर झळकवत असतात. पण त्याला काही अर्थ असतो का??, असा सवाल तेजस्वी यादव यांनी पाटण्यात करून अखिलेश यादव यांच्या भावी पंतप्रधान पोस्टरशी हवा काढून टाकली आहे.

पण या सगळ्यात मोदी विरोधात फार प्रयत्नपूर्वक बांधलेल्या I.N.D.I आघाडीच्या नेत्यांची एकाच खुर्चीवर गर्दी झाल्याचे चित्र निर्माण झाले आहे. I.N.D.I आघाडीत उद्धव ठाकरे, शरद पवार, नितीश कुमार, राहुल गांधी, प्रियांका गांधी असे एकापाठोपाठ एक “सरस” पंतप्रधान पदाचे उमेदवार आधीच तयार होऊन बसले आहेत. त्यात अखिलेश यादव यांची नव्याने भर पडली आहे.

akhilesh yadav next prime minister on poster

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात