नाशिक मध्ये आज गोदाप्रेमींचे एकत्रीकरण आणि सन्मान सोहळा; रामतीर्थ गोदावरी सेवा समितीचा उपक्रम

प्रतिनिधी

नाशिक : नाशिक मध्ये आज गोदाप्रेमींचे एकत्रीकरण आणि सन्मान सोहळा होत असून यात शेकडो गोदाप्रेमी सहभागी होणार आहेत. नाशिककरांच्या प्रिय गंगा गोदावरीचे भाव जागरण व्हावे या निमित्ताने रामतीर्थ गोदावरी समितीने आरती आणि निबंध स्पर्धेचे आयोजन केले होते. संस्कृत, मराठी, इंग्रजी आणि उर्दू या चार भाषांमध्ये निबंध स्पर्धा झाली यामध्ये 125 पेक्षा जास्त विद्यार्थी आणि पालकांनी सहभाग नोंदविला. या स्पर्धेतील विजेत्यांचा सन्मान या सोहळ्यात होणार आहे. Gathering and honor ceremony of goda lovers today in Nashik

आज रविवारी सायंकाळी 5.00 वाजता शंकराचार्य डॉ. कुर्तकोटी न्यास सभागृहात गोदाप्रेमींचे एकत्रीकरण आणि सन्मान सोहळा आयोजित केला असून या सोहळ्यात ज्येष्ठ विचारवंत पत्रकार रमेश पतंगे हे मार्गदर्शन करणार आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ प्रचार रवीजी भुसारी यांच्या अध्यक्षस्थानी असून प्रदेश भाजपचे प्रवक्ते माधव भंडारी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नाशिक विभाग संघचालक कैलासनाना साळुंखे यांची विशेष उपस्थिती असणार आहे.

या कार्यक्रमाला नाशिक मधील गोदाप्रेमींनी आवर्जून उपस्थित राहावे, असे आवाहन रामतीर्थ गोदा सेवा समितीचे अध्यक्ष जयंत गायधनी, उपाध्यक्ष शांताराम भानोसे आणि सचिव मुकुंद खोचे आदींनी केले आहे.

Gathering and honor ceremony of goda lovers today in Nashik

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात