रस्ते, रेल्वे, पेट्रोलियम, नैसर्गिक वायू आणि उच्च शिक्षण यांसारख्या प्रकल्पांचा आहे समावेश .
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज (रविवार, 1 ऑक्टोबर) तेलंगणाच्या दौऱ्यावर जाणार आहेत. पंतप्रधान कार्यालयाने दिलेल्या निवेदनानुसार, पंतप्रधान मोदी आज दुपारी 2:15 वाजता महबूबनगरला पोहोचतील, जिथे ते 13 हजार 500 कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पांची पायाभरणी आणि उद्घाटन करतील. यामध्ये रस्ते, रेल्वे, पेट्रोलियम, नैसर्गिक वायू आणि उच्च शिक्षण यांसारख्या प्रकल्पांचा समावेश आहे. त्यानंतर ३ ऑक्टोबरला पंतप्रधान मोदी निजामाबादलाही भेट देणार आहेत. Prime Minister Modis visit to Telangana today will visit projects worth 13 thousand 500 crores
तेलंगणामध्ये नोव्हेंबर महिन्यात विधानसभा निवडणुका होणार आहेत. ज्याची अधिसूचना ऑक्टोबरमध्ये जारी केली जाऊ शकते. निवडणूक होऊ घातलेल्या राज्यांमध्ये भाजपाला कोणतीही कसर सोडायची नाही. त्यासाठी पक्षाने आतापासूनच तयारी सुरू केली आहे. पंतप्रधान मोदींसह पक्षाचे सर्व ज्येष्ठ नेते निवडणूक होऊ घातलेल्या राज्यांच्या दौऱ्यावर जात आहेत.
केरळ ट्रेन जाळपोळ प्रकरण: कट्टरपंथी व्हिडिओ पाहून शाहरुख झाला जिहादी; NIAच्या आरोपपत्रात अनेक खुलासे
तेलंगणा दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी महबूबनगर आणि निजामाबादमधील विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन करणार आहेत. यासोबतच पंतप्रधान मोदी दोन्ही जिल्ह्यात जाहीर सभांना संबोधित करणार आहेत. तेलंगणाच्या मुख्य सचिव शांती कुमारी यांनी शुक्रवारी अधिकाऱ्यांना पंतप्रधान मोदींच्या निजामाबाद दौऱ्यासंदर्भात विभागांशी जवळीक साधून चोख व्यवस्था करण्याचे निर्देश दिले.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App