रस्त्यांना तलावाचे रूप आले असून, वाहनांमध्ये लोक अडकले आहेत.
विशेष प्रतिनिधी
न्यूयॉर्क : पुरामुळे अमेरिकेतील न्यूयॉर्क शहराची अवस्था वाईट झाली आहे. त्यामुळे येथे आणीबाणी लागू करण्यात आली आहे. मुसळधार पावसामुळे आलेल्या पुरामुळे रस्ते तलावासारखे दिसत आहेत. लोकांच्या घरात पाणी शिरले आहे. तर अनेक लोक रस्त्यावर गाड्यांमध्ये अडकले आहेत. शहरातील अनेक भाग पाण्याखाली गेले आहेत. आजूबाजूला फक्त पाणीच दिसत आहे. लोकांना सावधगिरी बाळगण्याचा सल्ला देण्यात आला आहे. तसेच प्रवासासंदर्भात सूचना जारी करण्यात आली आहे. New York became flooded An emergency was declared as the situation worsened due to floods
New York: The rain isn’t over yet. It is extremely dangerous to travel on flooded streets. As rain continues to impact downstate areas throughout the day, don’t attempt to walk, bike, or drive in these conditions. Stay safe. pic.twitter.com/gGeCShKR87 — Governor Kathy Hochul (@GovKathyHochul) September 29, 2023
New York: The rain isn’t over yet. It is extremely dangerous to travel on flooded streets. As rain continues to impact downstate areas throughout the day, don’t attempt to walk, bike, or drive in these conditions. Stay safe. pic.twitter.com/gGeCShKR87
— Governor Kathy Hochul (@GovKathyHochul) September 29, 2023
अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या पूर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर गव्हर्नर कॅथी हॉचुल यांनी न्यूयॉर्क शहर, लाँग आयलँड आणि हडसन व्हॅलीसाठी आणीबाणी जाहीर केली आहे. याशिवाय नागरिकांनी जलमय झालेल्या रस्त्यांवरून प्रवास करू नये अशी सूचनाही त्यांनी केली आहे. मात्र, पाऊस आणि पुरामुळे अद्यापपर्यंत कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
भारतीय लष्कर 400 हॉवित्झर तोफा खरेदी करणार; 48KM रेंज, उणे 30 ते 75 अंश तापमानात अचूकपणे फायर करू शकते
मेट्रो सेवा बंद झाली आहे. रस्ते आणि महामार्ग जलमय झाले असून, भुयारी मार्गाची व्यवस्था ठप्प झाली आहे. पुरामुळे लागार्डिया विमानतळावरील अनेक विमानांच्या उड्डाणांना उशीर झाला.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App