राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांच्या सगळ्या नियुक्त्या; भविष्यातल्या मोठ्या फाटाफुटीच्या पेरण्या!!

विशेष प्रतिनिधी

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शरद पवार आणि अजित पवार हे दोन “राष्ट्रीय” अध्यक्ष असताना दोन्ही गटांचे सर्वोच्च नेते पक्षात फूट पडली नसल्याचा दावा करत असले, तरी प्रत्यक्षात आपापल्या गटांच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या ते स्वतंत्र नियुक्त्या आणि नेमणुका करत आहेत. यातून प्रत्यक्षात भविष्यातल्या मोठ्या फाटाफुटीचीच पेरणी ते करत आहेत.NCP’s two factions appoints different office bearers ment to split the party further

राष्ट्रवादीच्या शरदनिष्ठ गटाने महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे यांची नियुक्ती केली. विद्या चव्हाण यांना त्यांनी नारळ दिला. त्यानंतर रोहिणी खडसे या महिला राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कसे राजकीय चैतन्य आणतील, याची वर्णने करणाऱ्या बातम्या मराठी माध्यमांनी दिल्या.



पण एकीकडे स्वतः शरद पवार, सुप्रिया सुळे आणि अजित पवार हे तिन्ही नेते राष्ट्रवादी काँग्रेस मधली फूट मान्य करायला तयार नाहीत. शरद पवार कायदेशीर लढाई टाळण्याचा प्रयत्न करत असले, तरी नव्या नव्या नियुक्त्यांद्वारे त्या कायदेशीर लढाईची पेरणीच ते करत आहेत. अजित पवार देखील याच स्वरूपाची पेरणी करत आहेत. त्यांनी वेगवेगळ्या पदांवर आधीच पदाधिकारी नेमून कामाला सुरुवात केली आहे. दोन्ही गटांचे जिल्हाध्यक्षही आता वेगळे झाले आहेत.

कौटुंबिक नाते टिकवण्याच्या नावाखाली स्वतः शरद पवार, सुप्रिया सुळे आणि अजित पवार एकमेकांविरुद्ध टीका करत नसले, तरी छगन भुजबळ, हसन मुश्रीफ, जितेंद्र आव्हाड, रोहित पवार यांच्यासारखे दुसऱ्या फळीतले नेते एकमेकांचे राजकीय ओरखडे काढत आहेत. पायताण आणि चपलेची भाषा वापरत आहेत. त्यातून राष्ट्रवादीतल्या दुसऱ्या फळी पासून तळागाळापर्यंत फुटीची नुसतीच बीजे पेरली गेली नाहीत, तर त्याला मोठे धुमारे फुटल्याचेच दिसत आहेत. त्यातच शरदनिष्ठ गटाने नियुक्त्यांचा वेग वाढवून या फाटाफुटीला आणखी खतपाणी घातले आहे.

 मूळ पक्षावर कब्जासाठी प्रयत्न

मूळ पक्षावर कब्जा मिळवण्यासाठी निवडणूक आयोग आणि त्यानंतरच्या न्यायालयातल्या लढाईसाठी दोन्ही गट प्रतिज्ञापत्रे भरून घेणे, नियुक्त्यांची पत्रे कायदेशीर करून घेणे वगैरे कामाला लागलेच आहेत. त्यामुळे वरवर आणि कौटुंबिक नाते जपण्याच्या नावाखाली पक्षात फूट नसल्याचा दावा केला तरी फुटीची बीजे खोलवर रुजून त्याचे परिणामही दिसत आहेत.

 एकजुटीची हाक दिली तरी

भविष्यात कधी शरद पवारांनी पुन्हा एकजुटीची हाक दिली, अजित पवारांनी त्यांना प्रतिसाद दिला तरी वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये, तालुक्यांमध्ये स्वतंत्रपणे कामाला लागलेले पक्षाचे अध्यक्ष, पदाधिकारी, वेगवेगळ्या सेलचे अध्यक्ष आणि बाकीचे पदाधिकारी यांच्यात मात्र जोरदार भांडणे लागणार हे या नियुक्त्यांमधूनच दिसून येत आहे. कारण पवार कुटुंबाच्या एकजुटीसाठी हाती आलेले कोणतेही मोठे पद दुसऱ्यासाठी सोडायला ते पदाधिकारी तयार होतील याची सुतराम शक्यता नाही. यातूनच वाद वाढून पक्षात वरपासून खालपर्यंत फूट पडेल हे निश्चित!!*

NCP’s two factions appoints different office bearers ment to split the party further

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात